विटेकर कुटुंबासाठी जिल्हा परिषद ठरली ‘लकी’!

file photo
file photo
Updated on

परभणी : जिल्हा परिषदेचे राजकारण विटेकर कुटुंबासाठी ‘लकी’ ठरले आहे. एकाच कुटुंबातील तिघांना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची संधी मिळाली आहे. पहिल्यांदा वडील, नंतर मुलगा आणि आता आई अध्यक्षपदावर विराजमान झाल्या आहेत.

जिल्हा परिषदेच्या राजकारणात सर्वच घराणी यशस्वी होतात असे नाही. परंतु, त्याला विटेकर कुटुंब अपवाद ठरले आहे. जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते दिवंगत उत्तमराव विटेकर (आबा) यांनी प्रथम जिल्हा परिषदेच्या राजकारणात आपले नशीब आजमावले. त्यांनी सहकाराच्या माध्यमातून जिल्ह्याच्या राजकारणात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. शांत, संयमी नेते म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी जिल्हा परिषदेत फेब्रुवारी १९९६ ते मार्च १९९७ पर्यंत अध्यक्षपद भूषविले आहे. तसेच त्यांनी सिंगणापूर मतदारसंघातून विधानसभेत प्रतिनिधित्व केले. वयोमानामुळे राजकारणातून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांचे पुत्र राजेश विटेकर यांनी जिल्हा परिषदेच्या राजकारणात उडी घेत आपल्या वडिलांचा वारसा चालू ठेवला.

पराभावाला न खचता पुन्हा उमेदीने काम 
सोनपेठ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापतिपद आणि जिल्हा परिषदेचे सदस्य अशी पदे भूषवत असताना सप्टेंबर २०१४ ते मार्च २०१७ या दरम्यान, राजेश विटेकर यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषविण्याची संधी मिळाली. त्या संधीचे सोने करत राजेश विटेकर यांनी जिल्ह्याच्या राजकारणात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. राष्ट्रवादीचा तरुण चेहरा म्हणून विटेकर पुढे आले. अध्यक्षपदाच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी केलेल्या विकासकामांचे बक्षीस म्हणून २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना थेट राष्ट्रवादी काँग्रेसकडून परभणीत उमेदवारी मिळाली. मात्र, त्या निवडणुकीत त्यांचा निसटता पराभव झाला. या पराभावाला न खचता त्यांनी पुन्हा त्याच उमेदीने काम सुरू ठेवले. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी असलेले सलोख्याचे संबंध आणि थेट पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा त्यांच्यावर असलेला विश्वास यामुळे यंदाच्या अध्यक्षपदाच्या निवडीत सुरवातीपासून पक्षाकडून त्यांच्या मातोश्री श्रीमती निर्मलाबाई विटेकर यांचे नाव पुढे आले.
थेट अजितदादांचे विश्वासू अशी ओळख असलेल्या राजेश विटेकरांना या निवडणुकीत पुन्हा बिनविरोध यश मिळाले आहे. मंगळवारी झालेल्या निवड प्रक्रियेत त्यांच्या मातोश्री निर्मलाबाई विटेकर यांच्या रूपाने विटेकर कुटुंबात तिसऱ्यांदा जिल्हा परिषदेची सत्ता आली आहे.

हेही वाचा व पहा -​  Video : पोलिसशस्त्रांच्या माहितीचे विद्यार्थ्यांना कुतूहल

सुप्रिया सुळे यांनी घेतली दखल
श्रीमती निर्मलाबाई विटेकर या अध्यक्ष होणार, याचे सुतोवाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी याआधीच सोशल मीडियाच्या माध्यमातून दिले होते. या संदर्भातील एक बातमी त्यांनी फेसबुकवर पोस्ट करत राष्ट्रवादीत कार्याची दखल घेतली जाते, अशा शब्दात विटेकर यांचा गौरव केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.