Devgaon Rangari News : जिल्हा परिषद शाळेतील नियुक्त शिक्षिका सहा वर्षापासुन प्रतिनियुक्तीवर! संतप्त पालकांनी शाळेस ठोकले कुलूप

शाळेची यशस्वी वाटचाल सुरू असतांना मात्र प्रतिनियुक्त शिक्षिका जयश्री मगरे या सहा वर्षापासून हजर होत नसल्याने शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
Devlana zp school locked by parents
Devlana zp school locked by parentssakal
Updated on

देवगाव रंगारी - देवळाणा, ता. कन्नड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांतील एक सहशिक्षिका गेल्या सहा वर्षापासून प्रतिनियुक्तीवर असल्या कारणाने त्यांनी हजर व्हावे, अथवा दुसऱ्या शिक्षकांची नेमणूक करण्यात यावी, या मागणीसाठी शिक्षण विभागाकडे सतत तोंडी, लेखी पाठपुरावा करुनही कोणताच निर्णय घेण्यात आला नसल्याने शेवटी देवळाणा येथील शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत व पालकांनी गुरुवारी (ता. १९) सकाळी शाळेच्या गेटला कुलुप ठोकुन दिवसभर आंदोलन केले. जोपर्यंत निर्णय लागत नाही तोपर्यंत माघार नसल्याचा पावित्रा गावकऱ्यांनी घेतला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.