महाभारत आणि त्याचे पात्र याविषयी आपण चर्चा, परिचर्चा आणि खूप काही करत असतो. पात्र वाचताना वा त्यांच्याविषयी ऐकताना आपण एक तिसरी व्यक्ती म्हणून काय चूक आणि काय बरोबर याचा सतत विचार करतो, की नाही हे नाही सांगता येणार मात्र आपल्या टिप्पणी सदैव तयार असतात.
महाभारताच काय, आपण आपल्या आजूबाजूला असलेल्या, आपल्या सोबत काम करणाऱ्या, वा आपल्या सोबत राहणाऱ्या लोकांना ते कसे चुकीचे आहेत हे दाखवून देण्याच्या सतत प्रयत्नात असतो. पण एक सांगू का, जर व्यवस्थापन करायचं असेल तर एकदा स्वतःच्या चुका मानून बघायला हव्यात. त्याचे कारण काय माहिती का, आपण कुठेतरी चुकतो हे ज्यावेळी कळतं त्यावेळी सहजच आपण समोरच्याला समजायचं कसं याचा मार्ग शोधू शकतो. बहुतेकांना सवय असते काहीही घडलं की लगेच समोरच्यावर त्याचा आळ टाकायचा. तर बहुतेकांना सवय असते स्वतःच खरं करून घेण्यासाठी वा स्वतः चा मार्ग सुकर करण्यासाठी एखाद्याचा खोट्या मार्गाने काटा काढायचा. पण काय आहे ना, अशा सर्व कारस्थानांमुळे एखाद्याचा शिशुपाल पण होऊ शकतो हे आपण विसरलो असतो.
शिशुपाल कोण ? या व्यक्तीविषयी विविध कहाण्या आहेत. पण सगळ्या कहाण्यांमधील एक साम्य म्हणजे शिशुपालाला शंभर अपराध करण्यापर्यंत सूट होती. म्हणजे त्याच्या आईला म्हणजेच स्वतःच्या आत्याला तिच्या मुलाचे शंभर अपराध क्षमा करील असे वचन कृष्णाने दिले होते असे काही म्हणतात. आणि युधिष्टिराने केलेल्या राजसूय यज्ञामध्ये त्याच्या त्या अपराधांचा म्हणजेच पापाचा घडा भरला आणि कृष्णाने त्याचा वध केला.
आता याच शिशुपालाच्या उदाहरणाचा आपण थोडा वेगळा वापर करूयात. शिशुपालाची एक इचछा होती रुक्मिणीशी लग्न करण्याची, ती कृष्णामुळे पूर्ण झाली नाही. इच्छा पूर्ण झाली नाही म्हणून असूया तिथे जन्माला आली. आणि असूया आली तेव्हा तिच्या मागोमाग जे काही चुकीचं असेल त्याने जागा घेतली त्यातही मोठी जागा घेतली ती क्रोधाने आणि त्याने कृष्णाची छबी बिगडवण्यासाठी जे जमेल ते केले. त्याच्याविषयी जश्या मार्गाने राग काढता येईल तो मार्ग अवलंबवला शेवटी झालं काय. नुकसान कोणाचं. आणि कश्यामुळे.
कृष्ण त्याच्या मार्गावर बरोबर होता आणि कोणाचा विनाकारणच काटा काढावा अशा हिशोबाने तो चालत नव्हता. तो कृष्ण होता म्हणून चुकीचं काम करणाऱ्याला त्याने स्वतः शिक्षा दिली. सामान्य माणसाचं काय ?
खरतरं आपल्या आजूबाजूला असे कितीतरी शिशुपाल असतात जे स्वतः कधीच समजू शकत नाही ते काहीतरी चुकीचं करताहेत, त्यांच्या हातून व्यवस्थापन तर होत नाहीच पण त्यांच्या समोरच्याच्या मनात असलेल्या प्रतिमेचा मृत्यू होतो. अश्या व्यक्ती विषयी मग ओढ तर राहत नाहीच पण ते त्याच्या मार्गावर इतके ठाम असतात कि पुढे मग कधी यांना साथीची गरज भासली तरी मग लोकं यायला पाहत नाही. कामाच्या म्हणजे ऑफिस वगैरेंच्या ठिकाणी अशी लोक आपली काम आणि मानधन तर मिळवून घेतात मात्र खरा मान मात्र गमावून बसतात. तिथेच ज्या ठिकाणी असे शिशुपाल असतात त्या जागेची किती योग्य मार्गाने प्रगतीला साथ देतील याचीही काही खात्री नसते.
असे जेव्हा घरांत वा नात्यात असतात तेव्हा नाती जपणे आणि सांभाळणे हा भाग तर सोडाच पण निभावणे सुद्धा कठीण होते. नंतर होते ती ताटातूट. आता विचार करून पहा कि जर व्यक्ती आपल्या आजूबाजूला असेल तर काय करता येईल, तर उपाय एकच, त्यांच्चा घडा त्यांनाच भरू द्यावा आपण साथ देण्याची वा त्याला पाणपोई समजण्याची चूक करू नये. पण आपला शिशुपाल तर होत नाहीये ना याची नक्की काळजी घ्यावी. कारण एकदा का शिशुपाल झाला तर होणार नाही ते व्यवस्थापन आणि चुकेल जे गणित ते नात्यांचं आणि आयुष्याच. आणि हो पुन्हा तेच या होण्या न होण्याला वय , पत , पद , शिक्षण इत्यादीं च बंधन नाही. पहा पटतंय का ?
संपादन - स्वाती हुद्दार
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.