समाज सक्षमीकरणासाठी सरसावल्या महिला कीर्तनकार सुनीताताई

महिला कीर्तनकार हभप सुनीताताईंनी उभी केलेली ओळख नक्कीच अभिमानास्पद आहे.
समाज सक्षमीकरणासाठी सरसावल्या महिला कीर्तनकार सुनीताताई
SYSTEM
Updated on

भक्ती ही अशक्यला शक्य करून दाखवते, पण अशक्यला शक्य करण्यासाठी भक्ती न करता परमेश्वरप्राप्तीसाठीच भक्ती करा... असा संदेश देत समाज सक्षमीकरणासाठी सुरू असलेली धडपड नक्कीच वाखाणण्याजोगी... समाजाचं देणं लागतो, या भावनेतून वारकरी संप्रदायाची पताका पुढे नेत असतानाच चांदवड तालुक्यातील शिंदे (भायाळे) येथील महिला कीर्तनकार हभप सुनीताताईंनी उभी केलेली ओळख नक्कीच अभिमानास्पद आहे.

भक्तीमार्गाची वाट भक्कम करत महिला कीर्तनकार म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर ओळख निर्माण केलेल्या सुनीताताई भिकाजी शिंदे या चांदवड तालुक्यातील शिंदे येथील रहिवासी... शिक्षण बारावीपर्यंतचे... वडील भिकाजी शंकरराव शिंदे यांचे आध्यात्मिक वारसा पुढे नेणारं शेतकरी कुटुंब... आई वत्सलाबाई आणि चार भाऊ, ३ बहिणी असे मोठं कुटुंब... शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या सुनीताताई यांच्यावर बालपणापासूनच भक्तीमार्गाचा प्रभाव होता. मात्र आयुष्याची वाट पुढे नेत असतानाच शिक्षणाबरोबरच शेतीसह भक्तीमार्गासाठी त्यांनी जणू वाहूनच घेतले होते.

समाज सक्षमीकरणासाठी सरसावल्या महिला कीर्तनकार सुनीताताई
ज्ञानेश्वरीचे वेगळे पैलू पुढे आणणारा संशोधक पां. ना. कुलकर्णी

गावातूनच मिळालं बाळकडू

शिंदे गावाची ओळख पंचक्रोशीत नेहमीच वारकरी संप्रदायाला मानणारं गाव म्हणून पूर्वापार चालत आलेली. मात्र गावाने दिलेला वसा पुढे नेत असतानाच गावातील धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेणाऱ्या भिकाजी शिंदे यांच्या कुटुंबातील सुनीताताई यांनी शाळेत जाण्याच्या वयातच भक्तीमार्गात पायी दिंडीत सहभाग नोंदवला. गावात आयोजित केल्या जाणाऱ्या नामसप्ताहात भाग घेत असतानाच शिक्षणाकडे कधीही दुर्लक्ष केले नाही. मात्र डी.एड.चे शिक्षण पूर्ण करून शिक्षक होण्याचं त्या पूर्ण करू शकल्या नाहीत.

एके काळी डी.एड.चे शिक्षण घेण्यासाठी असलेली स्पर्धा आणि त्यावेळची परिस्थिती अनुकूल नसल्याने त्या शिक्षक होवू शकल्या नाहीत. मात्र ही परिस्थिती ओळखून सुनीताताई यांचे भक्तीमार्गाकडे अधिकच लक्ष वेधले गेले. शिक्षक होण्यापासून दूर असलेल्या सुनीताताई मात्र वारकरी संप्रदायाशी जोडल्या गेल्याने थेट समाजशिक्षिका म्हणून प्रवचन, कीर्तनाच्या माध्यमातून स्वतःला सिद्ध करू शकल्याचे सांगताना त्यांचे डोळे भरून आले.

समाज सक्षमीकरणासाठी सरसावल्या महिला कीर्तनकार सुनीताताई
महाकाय दुर्बीण टाइम मशिनसह!

व्यवसायात घेतली उभारी

समाजशिक्षिका म्हणून जबाबदारी पेलवत असतानाच वडिलांचा शेतकरी कुटुंबातील वसा पुढे नेत असतानाच सुनीताताई यांनी शेती व्यवसायात स्वतःला झोकून दिले आहे. कोणत्याही पाठशाळेत कीर्तन, प्रवचनाचे धडे न घेतलेल्या सुनीताताई यांनी या क्षेत्रात आज महिला कीर्तनकार म्हणून स्वतःची ओळख भक्कम केली आहे. कीर्तनाच्या तारखांचा अपवाद वगळता अन्य वेळ त्या शेतीत तसेच दूध व्यवसाय पुढे नेण्यासाठी केला आहे. शेती व्यवसायाला पुढे नेत असतानाच सुनीताताई यांना गायी पालन करण्याचा छंद होता. यातूनच त्यांनी दुग्धपालन व्यवसायाला पुढे नेत आर्थिक स्रोत भक्कम केला आहे.

दूधविक्रीतून महिन्याकाठी सुनीताताई यांना होणारी कमाई या व्यवसायाला भक्कम करत गेली. शिंदे गावात आज स्वतःच शेतात राबत असताना शेतीपूरक व्यवसाय म्हणून त्यांनी दूग्ध व्यवसायाला त्यांनी अनेक वर्षांपासून भक्कम करताना गोपालनातून व्यवसायातही भरारी घेतली आहे. महिला म्हणून स्वतःला पुढे नेत असताना व्यवसाय निवडल्यानंतर त्यात झोकून दिले तर नक्कीच यश मिळतेच, असा ठाम विश्वास देत महिलांनी शेतीपूरक व्यवसायांमध्ये स्वतःचे करिअर करावे, असा सल्लाही त्या देतात.

महाराष्ट्रासह अन्य राज्यांतही ओळख

महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, गुजरात या राज्यांतही त्यांनी प्रवचनाच्या, कीर्तनाच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाची पताका पुढे नेली आहे. वारकरी संप्रदायात महिला कीर्तनकार म्हणून समाजसक्षमीकरणात आज हजारो महिलांना एकत्रित आणण्यासाठी हभप. सुनीताताई यांचे योगदान नक्कीच मोलाचे आहे. वडील भिकाजी शिंदे तसेच आई वत्सलाबाई आणि भावंडांनी दिलेल्या पाठबळामुळेच या

समाज सक्षमीकरणासाठी सरसावल्या महिला कीर्तनकार सुनीताताई
भूक सिंहासन खाते...

क्षेत्रात स्वतःची ओळख उभी केल्याचे अभिमानाने सांगताना समाजातील एकत्रीकरणाची चळवळ बळकट करण्यासाठी कीर्तन, प्रवचनांच्या माध्यमातून महिला कीर्तनकार हभप सुनीताताई शिंदे यांचे योगदान निश्चितच समाजाला प्रेरणादायी आहे. समाजशिक्षिकेची भूमिका बजावत असतानाच समाजाला वारकरी संप्रदायाच्या प्रवाहात आणताना नक्कीच मोठे समाधान मिळत असल्याचे त्या सांगतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.