Mumbai Water Storage : मुंबईत १० टक्के पाणी कपातीची टांगती तलवार

सतत फुटणा-या जलवाहिन्या, पाणी गळती आणि चोरी, पाण्याचे बाष्पीभवन, यामुळे मुंबईला पाणी पुरविणा-या तलावांमधील पाणी साठा खालावला आहे.
10 percent water cut in mumbai water storage
10 percent water cut in mumbai water storageSakal
Updated on

Mumbai News - सतत फुटणा-या जलवाहिन्या, पाणी गळती आणि चोरी, पाण्याचे बाष्पीभवन, यामुळे मुंबईला पाणी पुरविणा-या तलावांमधील पाणी साठा खालावला आहे. सद्या १८३ दिवस पुरेल इतके जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे मुंबईत १० टक्के पाणी कपातीची मुंबईकरांवर टांगती तलवार आहे.

मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, विहार आणि तुळशी या सात धरणांतून मुंबईला दररोज ३९५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. सद्या ७ लाख १४ हजार ६१३ दशलक्ष लिटर म्हणजे ४९.३७ टक्के इतका जलसाठा उपलब्ध आहे. हा जलसाठा १८३ दिवस पुरेल. मात्र गेल्या काही महिन्यात जलवाहिन्या सतत फुटत आहेत.

त्यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे. पाणी चोरी आणि गळतीचे प्रमाणही अधिक आहे. यामुळे सुमारे २७ टक्के पाण्याचा अपव्यय होतो. यंदा जर पाऊस लांबला तर मुंबईकरांवर पाणी टंचाई निर्माण होण्याची भिती आहे. त्यामुळे पाण्याचा वापर जपून करण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांतील जलसाठा सध्या निम्म्यावर आला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत जलसाठा पाहता तब्बल 20 दिवसांचा पाणीसाठा कमी झाल्याचे समोर आले आहे. तर बाष्पीभवनामुळे तलावातील पाणीसाठा कमी होत असल्याचा निष्कर्ष काढण्यात येत आहे. त्यामुळे मे महिन्यात १० टक्के पाणी कपात लागू होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.