मुंबई - यंदा पाऊस लांबल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणार्या सातही तलावांत केवळ १५७४१२ दशलक्ष लिटर म्हणजे केवळ १०.८८ टक्के पाणी शिल्लक आहे. हे पाणी ४० दिवस पुरेल इतके आहे.
सध्या तलाव क्षेत्रात पावसाने हजेरी लावली असली तरी तलावांत समाधानकारक पाणीसाठा जमा होईपर्यंत १ जुलैपासून मुंबईत १० टक्के पाणीकपात केली जाणार असल्याची माहिती पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी दिली.
मुंबईला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी अशा सात तलावांतून दररोज ३८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. यंदा मान्सूनचे उशिराने आगमन झाल्याने पाणी पुरवठा करणा-या तलावांनी तळ गाठला.
त्यामुळे मुंबईकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार होती. जून संपता संपता मान्सून सक्रीय झाला असला तरी तलाव क्षेत्रात पुरेसा पाऊस पडलेला नाही. गेल्या काही वर्षांपासून मान्सून सक्रिय होण्यास विलंब लागत असल्याने तलाव तळ गाठत आहेत.
त्यामुळे पालिकेला जून अखेरीस तलावात पुरेसा पाणीसाठा होईपर्यंत पाणीकपात लागू करून नियोजन करावे लागते आहे त्यानुसार तलावांत समाधानकारक पाणीसाठा जमा होईपर्यंत पालिकेने मुंबईत उद्या शनिवारी, १ जुलैपासून पाणी कपात करण्यात येणार आहे असे पालिका आयुक्त चहल यांनी म्हटले आहे.
गेल्या वर्षीदेखील पाणीसाठा ११ टक्क्यांपर्यंत खाली गेल्यामुळे २७ जूनपासून पाणीकपात लागू करण्यात आली होती. मात्र त्यानंतर जुलैमध्ये तलाव क्षेत्रात जोरदार पाऊस पडल्यामुळे दोन आठवड्यांनंतर पाणीकपात मागे घेण्यात आली होती.
सध्याचा जलसाठा (दशलक्ष लिटरमध्ये)
मोडक सागर - ४३३५५ (३३. ६३ टक्के)
तानसा - ४७४३८ (३२.७० टक्के)
मध्य वैतरणा - २८३९५ (१४.६७ टक्के)
भातसा - २६५९९ (३.७१ टक्के)
विहार - ८५३५ (३०.८१ टक्के)
तुळशी - ३०९० (३८.४० टक्के)
तीन वर्षांतील ३० जूनची स्थिती
२०२३ - १५७४१२ दशलक्ष लिटर (१०.८० टक्के )
२०२२ - १५२१५३ दशलक्ष लिटर ( १०.५१ टक्के)
२०२१ - २५७८३४ दशलक्ष लिटर ( १७.८१ टक्के)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.