भाईंदर ः मिरा-भाईंदर महापालिका प्रशासनाने मालमत्ता कर वसुलीची धडक मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून अवघ्या चार महिन्यांत शंभर कोटी रुपयांची वसुली करण्यात आली असल्याची माहिती कर निर्धारक व संकलक संजय दोंदे यांनी दिली आहे.मिरा-भाईंदर शहरात सुमारे तीन लाख 42 हजार मालमत्ता असून त्यात निवासी मालमत्तांची संख्या 2 लाख 87 हजार, तर व्यावसायिक मालमत्तांची संख्या 55 हजार इतकी आहे. पालिकेने सन 2020-21 या चालू आर्थिक वर्षात मालमत्ता करापोटी 271 कोटींचे उत्पन्न निश्चित केले आहे. गेल्या मार्च महिन्यापासून लॉकडाऊनच्या नियमामुळे पालिकेची आर्थिक कोंडी झाली आहे. पालिकेच्या उत्पन्नातील महत्त्वाचा स्रोत असलेल्या मालमत्ता कराची वसुली कोरोनामुळे रखडल्याने पालिकेकडून ऑनलाईन करभरणा प्रक्रिया राबवण्यात आली. मात्र, ही वसुली एकूण उद्दिष्टापैकी केवळ 0.55 टक्के इतकीच ठरल्याने पालिकेने ऑगस्ट महिन्याच्या मध्यान्हात कराची देयके वाटण्यास, तसेच ऑनलाईनसह थेट कर वसुलीस सुरुवात केली होती.
करवसुली उत्पन्नवर पालिका प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबवण्यात आल्याने ऑक्टोबर महिन्यापासून मालमत्ता कर वसुलीला जबरदस्त वेग आला आहे. आजमितीस मिरा-भाईंदर पालिकेने आत्तापर्यंत शंभर कोटी चाळीस लाख रुपये वसुली केले आहेत. ही वसुली एक लाख मालमत्ताधारकांकडून करण्यात आलेली आहे. पालिकेने चालू आर्थिक वर्षात 250 कोटी रुपयांचे उद्दिष्ट या कराच्या माध्यमातून करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. उर्वरित 150 कोटी रुपयांची वसुली एक लाख अडतीस हजार मालमत्ता धारकांकडून करावयाची आहे. थकबाकी वसुलीकरीता पालिका प्रशासनाकडून विविध प्रकारच्या मोहिमा हाती घेण्यात आल्या असून थकबाकीदारांकडून वसुली न झाल्यास त्यांचा पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार असल्याचा इशारा कर निर्धारक व संकलक संजय दोंदे यांनी दिला आहे
गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक -
कोरोनामुळे यंदा करवसुलीला मोठा फटका बसण्याची भीती पालिका प्रशासनामध्ये निर्माण झाली होती. मात्र, तरीदेखील जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला 100 कोटी रुपयांची वसुली झालेली आहे. गतवर्षीच्या तुलनेत ही वसुली 20 कोटी रुपयांहून अधिक असल्याची माहिती कर निर्धारक व संकलक संजय दोंदे यांनी दिली आहे.
100 crore tax collection from Mira Bhayander Municipality Additional revenue of over Rs 20 crore as compared to last year
----------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.