Mumbai Accident: कल्याण-पत्री पुलावर 106 चाकांचा ट्रेलर उलटला; डोंबिवलीहून कल्याणला जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी

Kalyan Patri bridge Traffic jam Accident: घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. सध्या ट्रेलर हटवण्याचे काम सुरु आहे. मात्र, यासाठी काही वेळ लागणार आहे.
Kalyan Patri bridge Accident
Kalyan Patri bridge Accident
Updated on

मुंबई- कल्याण-पत्री पुलावर बॉयलर घेऊन जाणारा १०६ चाकांचा ट्रेलर उलटला आहे. त्यामुळे डोंबिवलीहून कल्याणला जाणाऱ्या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. सध्या ट्रेलर हटवण्याचे काम सुरु आहे. मात्र, यासाठी काही वेळ लागणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणच्या पत्रीपुलावर हा अपघात घडला आहे. हेवी वस्तू घेऊन जाणारे ट्रेलर या मार्गावरून जात होता. बॉयलर घेऊन जाणाऱ्या या ट्रेलरला तब्बल १०६ चाके किंवा टायर आहेत. ट्रेलरला दोन पुलर घेऊन जात असतात. पण, सकाळी नाशिकच्या दिशेने जाताना एक पुलर उलटला अन् अपघात झाला आहे.

Kalyan Patri bridge Accident
Musheer Khan Accident : भारतीय क्रिकेटपटू रस्ता अपघातात जखमी; तीन महिने मैदानापासून दूर राहणार

सदर प्रकारामुळे मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. वाहतूक पोलीस, स्थानिक नागरिक, वाहनाचे चालक-वाहक मिळून वाहतूक सुरळित करण्याचा प्रयत्न करत आहेत. वाहनाला बाजूला करण्याठी क्रेन मागवण्यात आली आहे. सध्या वाहन रस्त्यावरून हटवण्यासाठी पळापळ सुरु आहे. वाहतूक सुरळित करण्यासाठी आणखी काही तास लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागू शकतो.

Kalyan Patri bridge Accident
Mumbai Accident: मेट्रोचा प्रचंड निष्काळजीपणा! मॅनहोलमध्ये पडून महिलेचा मृत्यू; मुंबईच्या अंधेरी पूर्वमधील घटना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.