मुंबई - कोरोनाचा विळखा भारतावर आणि त्यातही महाराष्ट्र्रात अधिक घट्ट होत चाललाय का असा प्रश्न आता उपस्थित होतोय. अशात आज एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बातमी महाराष्टरची चिंता वाढवणारी आहे. महाराष्ट्रातील कोरोनाचा कालचा ५२ वरील आकडा आज ६३ वर गेलाय. म्हणजेच मागील २४ तासात महाराष्ट्रात एकूण ११ कोरोना पॉझिटिव्ह केसेस समोर आल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे ११ पैकी १० कोरोना COVID19 पॉझिटिव्ह केसेस या मुंबईतील आहेत. त्यामुळे करोनानं राज्यात निर्माण झालेलं संकट अधिक गहिरं होताना पाहायला मिळतंय.
आज सकाळी महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांना याबाबत माहिती दिली आहे. महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती स्टेज २ वर असल्याचं राजेश टोपे यांनी नमूद केलंय. गेल्या २४ तासात वाढलेल्या ११ COVID19 पॉझिटिव्ह केसेस पैकी ८ जण परदेशातून कोरोना लागण घेऊन भारत आल्याचं देखील राजेश टोपे यांनी सांगितलंय. तर इतर तिघांना संसर्गातून कोरोनाची लागण झालीये.
मुंबई MMR, पुणे , पिंपरी चिंचवड आणि नागपुरातील सर्व सर्व खासगी कार्यालयं बंदच झाली पाहिजेत, दरम्यान सदर कारवाई करताना आपण घाई गडबड करून चालणार नाही. या व्यतिरिक्त राज्यातील सर्व महानगर पालिकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक मदत दिली गेलीये. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही रक्कम वापरात येणार आहे, असं देखील राजेश टोपे म्हणालेत.
दरम्यान, मुंबई महानगरातील लोकात ट्रेनच्या गर्दीवर देखील राजेश टोपे यांनी भाष्य केलंय. मुंबई महानगरातील गर्दी अशीच राहिली तर मात्र मुंबईची लाईफ लाईन बंद करावी लागेल असं पुन्हा एकदा राजेश टोपे यांनी म्हटलंय.
11 new corona positive cases in maharashtra 10 from mumbai maharashtra count goes on 63
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.