तीन दिवसांपूर्वी रमेश रावल उर्फ थापा हा सुरक्षारक्षक म्हणून या मंदिरात कामाला लागला होता. थापाने केवळ तीन दिवसात मंदिरात चोरी करण्याचा प्लॅन आखला.
उल्हासनगर : अवघ्या तीन दिवसांपूर्वी कामाला लागलेल्या सुरक्षारक्षकाने त्याच्या साथीदारांच्या मदतीने उल्हासनगरातील कालिमाता मंदिरामधील (Kalimata Temple) कालिमातेच्या अंगावरील 12 तोळे सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला आहे. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात (Vitthalwadi Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुर्ला कॅम्प चौकात 65 ते 70 वर्षांपूर्वीचे सुप्रसिद्ध कालिमाता मंदिर आहे. तीन दिवसांपूर्वी रमेश रावल उर्फ थापा हा सुरक्षारक्षक म्हणून या मंदिरात कामाला लागला होता. थापाने केवळ तीन दिवसात मंदिरात चोरी करण्याचा प्लॅन आखला आणि पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास साथीदारांच्या मदतीने मंदिराचे कुलूप व दरवाजा तोडून कालिमातेच्या अंगावरील 12 तोळे सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला, अशी माहिती मंदिराचे सरचिटणीस सुरजित बर्मन यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
थापा व त्याचे साथीदार दागिने, सीसीटिव्ही,डीव्हिआर सोबत फरार झाल्यावर विठ्ठलवाडी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.