मुंबईत DRI ची कारवाई, १२५ कोटींचे हेरॉइन जप्त

drugs file photo
drugs file photogoogle
Updated on
Summary

नवी मुंबईतील न्हावा शेवा बंदरावर १२५ कोटींचे ड्रग्स सापडले.

मुंबई : मुंबईत आणखी २५ किलोहून अधिक हेरॉइन ड्रग्ज (drugs) जप्त करण्यात आले आहे. डीआरआयच्या मुंबई झोनल युनिटने (DRI) नवी मुंबईच्या न्हावा शेवा बंदरावर (nhava sheva port mumbai) छापा टाकला. यावेळी हे ड्रग्स मिळाले असून याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात १२५ कोटी असल्याचे सांगितले जात आहे.

drugs file photo
आर्यन खानसह तिन्ही आरोपी विदेशी ड्रग्स तस्करांच्या संपर्कात - NCB

डीआरआयच्या मुंबई झोनल युनिटला अंमली पदार्थाची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर झोनल युनिटने नवी मुंबईतील न्हावा शेवा बंदरावर छापा टाकला. यावेळी एका कंटेनरमध्ये तब्बल २५ किलोहून अधिक हेरॉइन आढळून आले. पोलिसांनी हे ड्रग्स जप्त केले असून येथून एका व्यावसायिकाला देखील अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, यापूर्वी गुजरात येथील कच्छ जिल्ह्यातील मुंद्रा बंदरावर १६ सप्टेंबर रोजी महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या छापेमारीत मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ सापडले होते. दोन वेगवेगळ्या कंटेनरमध्ये प्रक्रिया केलेल्या टाल्क स्टोनच्या आवरणाखाली तब्बल २,९८८ किलोग्रॅम हेरॉईन ड्रग्ज सापडलं. अंमली पदार्थांची तस्करी करणारी ही जहाजं अफगाणिस्तानमधून इराणमार्गे भारतात पाठवण्यात आली होती. यानंतर अनेकांनी राजकीय टीका-टीप्पणी देखील केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.