डोंबिवली - डोंबिवली पूर्वेकडील कावेरी चौकात बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास भरधाव टेम्पोच्या धडकेत एका 14 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा 15 वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला आहे. या अपघातानंतर टेम्पोचालकाला मानपाडा पोलिसांनी अटक केली असून, तो दारूच्या नशेत गाडी चालवत असल्याचे प्राथमिक तपासात आढळले आहे.