भाजपाला मोठं खिंडार पाडण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीचा मेगाप्लान..

भाजपाला मोठं खिंडार पाडण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीचा मेगाप्लान..
Updated on

नवी मुंबई - नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक तोंडावर आहे. अशात निवडणुकीपूर्वीच आता भाजपाला मोठा फटका बसणार आहे. कारण एक दोन नव्हे तर तब्बल १५ भाजप नगरसेवक पक्ष सोडणार असल्याची माहिती आता समोर येतेय. गणेश नाईक यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आली. अशात आता नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांपूर्वी जर १५ नगरसेवक भाजपातून गेले तर याचा मोठा फटका भाजपाला बसू शकतो.   

राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेश करताना गणेश नाईक यांच्यासोबत १५ नगरसेवक भाजपात गेले होते. अशात हे १५ नगरसेवक आता भाजपाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहेत असं बोललं जातंय. मिळलेल्या माहितीच्या आधारे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे काही मोठे नेते या १५ नगरसेवकांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे येत्या काळात शिवसेना आणि राष्ट्रवादीत हे नगरसेवक येताना पाहायला मिळतील. १५ नगरसेवकांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली तर भाजपाला मोठं खिंडार पडताना पाहायला मिळेल. 

नवी मुंबई महानगरपालिकेवर गणेश नाईक यांचं कायम वर्चस्व राहिलंय. मात्र त्यांच्या कामावर काही नगरसेवक नाराज असल्याचं देखील बोललं जातंय. म्हणूनच हे १५ नगरसेवक भाजपाला सोडचिठ्ठी देणार असं बोललं जातंय. गणेश नाईक यांच्याकडून नवी मुंबई महानगरपालिका काढून घेणं राष्ट्रवादी आणि शिवसेनेसाठी सोपं नाहीये. एकीकडे राष्ट्रवादी आणि शिवसेनेतर्फे १५ नाराज नागरसेवकांशी संपर्क केला जातोय तर दुसरीकडे गणेश नाईक देखील या १५ नगरसेवकांची नाराजी दूर करण्यासाठी पावलं उचलतायत. 

दरम्यान येत्या काळात जर भाजपातील १५ नगरसेवक फुटून राष्ट्रवादी किंवा शिवसेनेत गेले तर येणारी निवडणूक गणेश नाईकांसाठी कठीण होईल असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे    

15 unhappy bjp corporators are planning to quit bjp and in contact with shivsena and NCP

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.