Navi Mumbai: महापालिकेने उभारलेल्या दिडशे कोटींच्या मालमत्ता नियोजनशून्य कारभारामुळे वापराविना धुळखात पडून आहेत. त्यात बहुउद्देशीय इमारती, ग्रंथालये, समाज मंदिर आणि भाजीपाला मार्केटचा समावेश असून इमारत उभारण्यापूर्वीच्या त्याच्या वापराचे नियोजन नसल्यामुळे गेल्या चार वर्षांपासून पायाभूत सेवा-सुविधांवर कोट्यवधींचा अक्षरक्षः चुराडा झाला आहे.
सुनियोजित शहर म्हणून नवी मुंबई महापालिकेचा देशात नावलौकिक आहे. शहरातील नागरीकांना पायाभूत सुविधा पुरवण्यामध्ये महापालिका नेहमी अग्रेसर असते. महापालिकेच्या उत्पन्नापेक्षा खर्च कमी असल्यामुळे पालिकेची तिजोरी भरलेली आहे.
परंतु, पैसे खर्च करण्याचे नियोजन नसल्यामुळे महापालिकेचा ‘श्रीमंतीचा बाणा भिकेकडे घेऊन जाणारा’ ठरण्याची दाट शक्यता आहे. शहरातील नागरीकांना विविध सेवा देण्याच्या नावाखाली अभियांत्रिकी विभागाने गेल्या चार वर्षांमध्ये तब्बल १५० कोटींची विविध इमारती उभ्या केल्या आहेत.
मात्र, संबंधित विभागांनी अद्याप त्याच्या वापराबाबत कोणतेही नियोजन केले नसल्यामुळे महापालिकेने तयार करून वापराविना पडलेल्या इमारतींमध्ये बहुउद्देशीय इमारती, ग्रंथालये, समाज मंदिर आणि मार्केट या सर्व इमारती धूळ खात पडून आहेत.
तयार झालेल्या बांधकामाचे नाव अंदाजित खर्च
- ऐरोली सेक्टर १८ योगा सेंटर - ४० लाख
- ऐरोली सेक्टर ७ पिर सय्यद उद्यान - ४ कोटी
- ऐरोली सेक्टर ८ येथे क्रांतिसिह नाना पाटील उद्यान - ४ कोटी
- पावणे येथील श्रमीकनगर वाचनालय - ३५ लाख
- ऐरोली चिंचपाडा ग्रंथालय - ३५ लाख
- नेरुळ येथील शिवाजीनगर वाचनालय - ३५ लाख
- बेलापूर विभागातील नेरुळ सेक्टर ३८ ज्येष्ठ नागरिक भवन - ४ कोटी
- नेरुळ सेक्टर ४८ येथे डे केअर इमारत - ४ कोटी
- रमाबाई नगर सेक्टर ८ बी येथील बहुउद्देशीय इमारत - ६ कोटी
- बेलापूर सेक्टर ६ बी वीर जवान मैदानात बहुउद्देशीय इमारत - अडीच कोटी
- बेलापूर सेक्टर २ येथे व्यायाम शाळा - साडेतीन कोटी
- बेलापूर सेक्टर २ येथे शकुंतला महाजन बहुउद्देशीय इमारत - पाच कोटी
मार्केट इमारती
- कोपरखैरणे सेक्टर १५ येथे मार्केट - ७ कोटी
- कोपरखैरणे सेक्टर १६ वर भूखंड क्रमांक ८ व ८ एन - १ कोटी
- कोपरखैरणे सेक्टर ६ येथे भूखंड क्रमांक ८ व ८ एल - ६० लाख
- कोपरखैरणे सेक्टर २ येथे भूखंड क्रमांक ८ व ८ एल - ५० लाख
- घणसोली रात्र निवारा केंद्र सेक्टर ४ भूखंड क्रमांक २४० - ४ कोटी
- घणसोली समाजमंदीर सेक्टर ७ इमारत - ३ कोटी
- ऐरोली गावातील जून्या स्मशानभूमीच्या जागेवर मासळी मार्केट - ४ कोटी
- ऐरोली सेक्टर २, ऐरोली सेक्टर ५, ऐरोली सेक्टर ६ - गाळे वाटप बाकी आहे - १५ लाख प्रत्येकी
- नेरुळ सेक्टर १४ येथे भाजी व मासळी मार्केट - ५ कोटी
- नेरुळ सेक्टर १४ येथे भाजी व मासळी मार्केट तयार - ५ कोटी
- जूईनगर सेक्टर २३ गावदेवी समाजमंदिर - ३ कोटी
- बेलापूर सेक्टर ८ समाजमंदिर - १ कोटी
- सीबीडी सेक्टर १५ वाहनतळ इमारत - ३६ कोटी निविदा प्रक्रियेत
- बेलापूर सेक्टर १ भाजीपाला मार्केट - साडे तीन
- बेलापूर सेक्टर ३ राजीव गांधी मैदान मार्केट - ४० लाख
- सानपाडा सेक्टर ४ दैंनदिन मार्केट - पावणे तीन कोटी
- सानपाडा सेक्टर १४ दैनंदिन मार्केट - चार कोटी
- वाशी सेक्टर ३ बहुउद्देशीय इमारत तयार - १९ कोटी खर्च
- वाशी सेक्टर १ ए येथे रोज बाजार इमारत - साडे चार कोटी खर्च
फेरीवाल्यांचा रस्त्यांवर वावर
- नेरूळ, जूईनगर, वाशी आणि कोपरखैरणे या भागात महापालिकेने मोठ्या प्रमाणात भाजीपाला आणि मासळी मार्केट इमारती तयार केल्या आहेत. परंतु, संबंधित विभागाने या गाळ्यांचे वाटप केले नसल्याने या इमारतींचा फेरीवाल्यांकडून वापर सुरु झालेला नाही. परिणामी, हे सर्व भाजीपाला व मासळी विक्रेते सुविधा असून देखील पुन्हा रस्त्यावर बसलेले दिसतात.
- बहुउद्देशीय इमारती आणि समाज मंदिरांची अशीच अवस्था झाली आहे. वाशी, जूईनगर, सीबीडी या भागात लोकांच्या मागणीस्तव महापालिकेने दोन मजली भव्य समाज मंदिर आणि तीन मजली बहुउद्देशीय इमारती उभ्या केल्या आहेत. या इमारती उभारण्यावर साधारणतः २० ते २५ कोटी रुपये खर्ची घातले आहेत. मात्र, तयार होऊन सुद्धा अनेक वर्षे वापराविना पडून राहिल्याने पैशांची नुकसान होत आहे.
-------------------------------
भाड्याने देण्याच्या सूचना
वापराविना पडून असलेल्या इमारतींवर झालेला खर्च आणि वापर याबाबत महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी चिंता व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वीच झालेल्या आढावा बैठकीत नार्वेकर यांनी संबंधित इमारती तात्काळ भाड्याने देण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या आहेत. परंतु, अद्याप ठोस कारवाई झालेली दिसत नाही. तसेच या इमारती भाड्याने देऊन उत्पन्न वाढवण्याच्या अनुषंगाने महापालिका प्रशासनाने ठोस पावले उचललेली दिसत नाहीत.
----------------------------------
शहरात पायाभूत सुविधा उभारताना त्याचा आधी वापर निश्चित झाल्यानंतर यापुढे सुविधांच्या इमारती उभारण्यात येणार आहे. संबंधित विभागाकडून इमारतीची निकड कळवत नाही. तोपर्यंत त्या इमारतींचे बांधकाम न करण्याचा निर्णय अभियांत्रिकी विभागाने घेतला आहे.
- संजय देसाई, शहर अभियंता, नवी मुंबई महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.