Dharavi News: तोडण्यात येणाऱ्या धारावी जवळच्या त्या पुलामुळे मोठा गोंधळ होण्याची शक्यता!

धारावी बचाव आंदोलन व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे रेल्वे प्रशासन, पालिका व राज्य सरकारला यासंदर्भात निवेदन देण्यात आली
धारावी जवळच्या त्या पुलामुळे मोठा गोंधळ होण्याची शक्यता!
धारावी जवळच्या त्या पुलामुळे मोठा गोंधळ होण्याची शक्यता!Sakal
Updated on

Dharavi News : धारावीतून जाणाऱ्या संत रोहिदास मार्गावरून सायन च्या दिशेला जाण्यासाठी 150 वर्षांपूर्वी उभारलेला वाहतूक पूल पाडून नव्याने उभारण्याची योजना मध्य रेल्वे प्रशासनाने आखली आहे. त्याची तयारी म्हणून पुलाच्या बाजूला पत्रे उभारले आहेत. त्यास धारावीतून प्रखर विरोध होत आहे.

धारावी बचाव आंदोलन व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे रेल्वे प्रशासन, पालिका व राज्य सरकारला यासंदर्भात निवेदन देण्यात आली आहेत. समाज माध्यमावर काल पासून काही वृत्तपत्रांची कात्रणे फिरत आहेत.

ज्यात रात्रीच्या वेळेस पूल पाडला जाणार आहे. असे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. यामुळे धारावीतील रहिवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. २० जानेवारीपासून उड्डाणपूल बंद केला जाणार असल्याच्या बातम्यांमुळे धारावीत खळबळ माजली आहे. रेल्वे प्रशासनाने योग्य तोडगा न काढता उड्डाणपूल बंद केल्यास मोठा गोंधळ माजण्याची शक्यता आहे.

धारावीतून शिक्षणासाठी तसेच अन्य कामासाठी धारावीतील रहिवाशांना सायनला जाण्यासाठी हा जवळचा रस्ता आहे. गेली अनेक वर्षांपासून या पुलाचा वापर मोठ्याप्रमाणावर केला जात आहे. वाहतूक पुलावर असलेल्या पदपथावरून पादचाऱ्यांना चालत जाण्यासाठी सोय आहे.

धारावीतील अनेक विद्यार्थी सायन येथील आवर लेडी शाळा, साधना विद्यालय, डी. एस. हायस्कूल, पी. एस. डब्ल्यू. शाळा, तसेच महाविद्यालयात जाण्यासाठी या पुलाचा वापर करतात. काही विद्यार्थी पायी जाण्यासाठी पुलावरील पदपथाचा वापर करतात तर काही विद्यार्थ्यांचे पालक आपल्या दुचाकीवरून विद्यार्थ्यांना शाळेत ने आण करतात.

वांद्रे-कुर्ला संकुल, लाल बहाद्दूर शास्त्री मार्ग, संत रोहिदास मार्ग असा उपनगर व मुंबई शहराला जोडणारा असा मुंबईतील महत्वाचा असलेला उड्डाणपूल लवकरच पडून तेथे नवा पूल बांधण्याचा रेल्वे प्रशासनाने ठरवले आहे.

पुलाची पश्चिम वाहिनी बंद केल्याने डॉ. बी. ए. रोड दक्षिण वाहिनी शीव जंक्शनवरील वाहतूक ही शीव सर्कल, शीव रुग्णालय जंक्शन येथून उजवे वळण घेऊन, सुलोचना शेट्टी मार्गाने पुढे कुंभारवाडा जंक्शन येथून जावे लागेल.

कुर्ला व धारावीकडे कुंभारवाडा जंक्शन येथून उजवे वळण घेऊन के. के. कृष्णन मेनन मार्ग रोडने अशोक मिल नाका उजवे वळण घेऊन संत रोहिदास मार्गाने पुढे पैलवान नरेश माने चौक येथून डावे वळण घेऊन इच्छित स्थळी जावे लागेल.

पश्चिम द्रुतगती मार्ग व वांद्रे कडे कुंभारवाडा जंक्शन येथून सरळ संत कबीर मार्ग रोडने केमकर चौक येथून उजवे वळण घेऊन शीव- माहीम लिंक रोडने टी. जंक्शन येथून डावे वळण घेऊन कलानगर जंक्शन मार्गे इच्छित स्थळी पोहचावे लागेल.

यामुळे धारावीतील रहिवाशांना मोठा वळसा घालून जावे लागेल त्यात वेळ व इंधन खर्च होईल याकडे मनसे चे स्थानिक नेते संदीप कदम यांनी यांनी वेधले आहे. तर रेल्वे प्रशासनाने स्थानिक रहिवाशांना होणाऱ्या नाहक त्रासाबद्दल सकारात्मक विचार करावा असे आवाहन धारावी बचाव आंदोलनाचे नेते माजी आमदार बाबुराव माने, ऐड. राजेंद्र कोरडे, संजय भालेराव आदींनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.