Kalva Crime : खाजगी रुग्णालयात डॉक्टरांच्या हलर्जीपणामुळे 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृत्यू, नातेवाईकांचा आरोप!

कळव्यातील महात्मा फुले नगर येथे राहणाऱ्या मृत कोमल शंकर राठोड या मुलीच्या छातीमध्ये गाठ आल्याने तिच्यावर कळव्यातील आयुष्यमान रुग्णालयात उपचार सुरू होते.
Komal Rathod
Komal Rathodsakal
Updated on

कळवा - कळव्यातील महात्मा फुले नगर येथे राहणाऱ्या मृत कोमल शंकर राठोड (वय-16) या मुलीच्या छातीमध्ये गाठ आल्याने तिच्यावर कळव्यातील आयुष्यमान रुग्णालयात उपचार सुरू होते. डॉक्टर श्याम पांडे यांच्या सल्ल्यानुसार मंगळवार (ता. 1) तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले व तिच्यावर मंगळवार (ता. 2) ऑपरेशन करण्यात आले.

ऑपरेशन यशस्वी झाल्याचे तिच्या नातेवाईकांना सांगण्यात आले. मात्र ऑपरेशननंतर दुसऱ्या दिवशी इन्स्पेक्शन होऊन तिला 105 डिग्री ताप येऊन तिचे सर्व अंग सुजले व त्यानंतर तीन दिवसांनी आमच्याकडे हे इन्स्पेक्शन दूर करण्यासाठी मशीन नसल्याने तिला कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी हलविण्याचा सल्ला दिला.

परंतु कळवा रुग्णालयात नेल्यावर तिची प्रकृती अधिक गंभीर होऊन तिचा सोमवार (ता. 7) ला तिचा मृत्यू झाला. मृत कोमलचा मृत्यू डॉक्टर श्याम पांडे यांनी चुकीचे उपचार करून व केलेल्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी करून कळवा पोलिसांनी या डॉक्टरला अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा घेतला आहे.

नातेवाइकांची कळवा पोलीस ठाण्याबाहेर गर्दी

मुलीचा मृत्यू झाल्याची घटना समजताच महात्मा फुले नगरमधील तिच्या नातेवाईकांनी व येथील नागरिकांनी सोमवारी सायंकाळी कळवा पोलीस ठाण्याबाहेर गर्दी केली होती. तिच्या नातेवाईकांनी कळवा पोलिसाकडे डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

मृत कोमल ठाणे महापालिका शाळेतील नववी मधील विद्यार्थिनी

मृत कोमल ठाणे महापालिका शाळेतील महात्मा फुले नगर येथील ठाणे महापालिका शाळेत इयत्ता नववी मध्ये शिकत होती स्वभावाने सालस व अभ्यासाने हुशार असल्याची माहिती तिच्या नातेवाईकांनी दिली. तिचा मृत्यू झाल्याचे समजताच महात्मा फुले नगर परिसरात शोककळा पसरली आहे. या संदर्भात कळवा पोलिसांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, 'नातेवाईकांना मृतदेह ताब्यात घेण्या संदर्भात समजावले आहे शवविच्छेदन अहवालातून डॉक्टरने चुकीचे उपचार केल्याचा अहवाल आला तरच गुन्हा दाखल करता येईल.'

- अशोक उतेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कळवा पोलीस ठाणे,

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.