Mumbai News : माहिम समुद्रात बुडून १७ वर्षाच्या मुलाचा मृत्यू

माहिम समुद्रात मित्रांसोबत गेलेल्या मुलाला खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला.
drowned death
drowned deathsakal
Updated on

मुंबई - माहिम समुद्रात मित्रांसोबत गेलेल्या मुलाला खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. या दुर्घटनेत पीयुष ओबेरॉय (१७) वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना आज घडली

माहीम कस्टम रोड, माहीम दर्गा, मकदूम सी पॅलेस इमारतीच्या मागील बाजूस असलेल्या समुद्रात पीयूष ओबेरॉय ५ ते ६ मित्रांसोबत आज सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास पाण्यात गेला होता. यावेळी खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला.

यावेळी सोबत असलेल्या मित्रांनी घडलेल्या घटनेची माहिती स्थानिक लाईफ गार्ड आणि पोलिसांनी दिली. लाईफ गार्डनी धाव घेत पीयूष ओबेरॉय या मुलाला बाहेर काढले आणि सायन रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.