विहिरीत पोहोताना १७ वर्षीय युवकाचा मृत्यू

विहिरीच्या खोलीचा आणि पाण्याचा अंदाज न असल्याने तो बुडाला असावा
17 year old dies while swimming in well
17 year old dies while swimming in wellsakal
Updated on

ठाणे - कळवा, पारसिक हिल, येथील कारगिल डोंगरावरील विहिरीमध्ये पोहताना नवी मुंबई दिघा येथील सुमित मनोज माळी या १७ वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू झाला. सुमारे ७०० ते ८०० मीटर उंची असलेल्या डोंगरावरती असलेल्या विहीरिमध्ये तो आपल्या सहा  मित्रांसोबत शुक्रवारी पोहण्यासाठी गेला होता. शनिवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह अंदाजे ३० ते ३५ फुट खोल असलेल्या विहीरीतून बाहेर काढण्यात आले, विहिरीच्या खोलीचा आणि पाण्याचा अंदाज न असल्याने तो बुडाला असावा अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे, अशी आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

कळवा पूर्व येथील कारगिल डोंगरावरील विहिरीत एक जण बुडल्याची माहिती शुक्रवारी सायंकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास ठाणे महापालिका प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षेत आलेल्या दूरध्वनीवर देण्यात आली. तातडीने घटनास्थळी कळवा पोलीस कर्मचारी, सहाय्यक आयुक्त (कळवा प्रभाग समिती), प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी व कर्मचारी, ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान, आपत्ती व्यवस्थापन कक्षातील स्विमर्स, तसेच ठाणे अग्निशमन दलाचे जवान १-रेस्क्यू वाहनासह दाखल झाले.

हा प्रकार सुमारे ७०० ते ८०० मीटर उंची असलेल्या डोंगरावरती असलेल्या विहीरीत घडला होता. त्यातच जाण्यासाठी अरुंद रस्ता असल्यामुळे व रात्रीच्या अपुऱ्या प्रकाशामुळे त्या ठिकाणी पोहचणे अशक्य होते. तसेच कळवा पोलिस कर्मचारी व कुटुंबीयांच्या परवानगीने शोधकार्य थांबविण्यात आले होते. तर शनिवारी सकाळी ०७:३० वाजल्यापासून त्या ठिकाणी पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात आले. सुमारे ३- तासांच्या प्रयत्नानंतर सकाळी १०:३० वाजताच्या सुमारास त्या युवकाचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला.

तसेच मृतदेह डोंगरावरून खाली आणायला सुमारे ५०-मिनिटाचा कालावधी लागला.त्यानंतर, तो मृतदेह कळवा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. सुमित माळी हा आपल्या ६-मित्रांसोबत विहिरीमध्ये पोहण्याकरिता गेला होता. विहिर ही अंदाजे ३० ते ३५ फुट खोल असू विहीरीचा खोलीचा व पाण्याचा अंदाज न आल्यामुळे सुमित विहिरीमध्ये बुडाला असल्याची शक्यता वर्तविण्या येत आहे, असे आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.