Mumbai Crime: राज्यात नेमकं चाललंय काय? वांद्रे परिसरात १८ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार; एकाला अटक, दुसरा फरार

Bandra Sexual Abuse Crime Latest Updates: निर्मल नगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Rape News
Rape Newsesakal
Updated on

Mumbai Crime Updates: राज्यात महिलांवरील आत्याचाराच्या घटना गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे. यादरम्यान वांद्रे परिसरात १८ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याचा प्रकार समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी ३१ वर्षीय इसमाला अटक करण्यात आली आहे तर दुसरा आरोपी अद्याप फरार असल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी कारने काकांच्या घरी सोडण्याचं आश्वासन देऊन तरुणीला गाडीत बसवले. त्यानंतर पाण्याच्या बाटलीतून गुंगीच पेय पाजून तरुणी बेशुध्द पडल्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. इतकेच नाही तर तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी देखील दिली. या प्रकरणी निर्मल नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.