Navi Mumbai Crime: गुन्ह्याची भीती दाखवून सायबर टोळीने उकळले १९ लाख

Navi Mumbai Crime: गुन्ह्याची भीती दाखवून सायबर टोळीने उकळले १९ लाख
Navi Mumbai Crime:sakal
Updated on

Pavel Crime: पोलीस अधिकारी असल्याचे भासवून एका सायबर टोळीने कामोठे येथे राहणाऱ्या एका ३० वर्षीय व्यक्तीकडून तब्बल १९ लाख ५० हजार रुपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

त्यांच्या नावाने इराण येथे जाणाऱ्या पार्सलमध्ये अमली पदार्थ व आक्षेपार्ह साहित्य आढळल्याचे सांगून त्यांना अटक करण्याची भीती दाखवून त्यांची फसवणूक केली होती. याप्रकरणी कामोठे पोलिसांनी सायबर टोळीविरोधात फसवणुकीसह आयटी ॲक्टनुसार शुक्रवारी (ता. ७) गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Navi Mumbai Crime: गुन्ह्याची भीती दाखवून सायबर टोळीने उकळले १९ लाख
Chhatrapati Sambhajinagar Crime : उद्योगनगरीत गुंडाराज! वाळूज एमआयडीसी परिसराला गुंडांची लागली दृष्ट

फसवणूक झालेल्या व्यक्तीच्या नावे फेडेक्स कंपनीच्या इंटरनॅशनल कुरिअरमधून त्याच्या नावाने मुंबई येथून इराण येथे जात असलेल्या पार्सलमध्ये विवादित सिम कार्ड, पासपोर्ट व डेबिट कार्ड, पीसीटी नावाचे अमली पदार्थ आढळून आल्याचे सांगितले होते. त्यामुळे त्यांची चौकशी करणार अशी भीतीही त्यांना दाखवून ऑनलाईन माहिती देण्यास भाग पाडले.

त्यानंतर सायबर चोरट्यांनी त्या व्यक्तीच्या नावाने परस्पर १९ लाख ५० हजारांचे पर्सनल लोन काढून फसवणूक केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर संबंधित व्यक्तीने कामोठे पोलिसात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

Navi Mumbai Crime: गुन्ह्याची भीती दाखवून सायबर टोळीने उकळले १९ लाख
Nashik Bribe Crime : ‘सिव्हिल’चा लाचखोर कनिष्ठ लिपिक अटकेत; बिल मंजुरीसाठी स्वीकारले 5 हजार रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.