मित्राचा पाय पकडल्याने दुसऱ्याचा जीव वाचला
पनवेल: तालुक्यातील वाजे येथील बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या फार्महाऊस जवळील कुंडी धबधब्याच्या पाण्यात बुडून एका तरूणाचा मृत्यू झाला. आपल्या मित्रांसह वर्षा सहलीचा आनंद घेण्यासाठी १९ वर्षीय मौसिन मुघल हा धबधब्यावर गेला होता. त्यावेळी त्याचा पाय घसरून तो पडला आणि मोठ्या खड्ड्याच्या पाण्यात बुडून त्याचा मृत्यु झाला. (19 Years Old Boy dead after drowning in waterfall near Bollywood Actor Salman Khan Farmhouse)
खरं पाहता वाजे परिसरात जाण्याच्या प्रत्येक रस्त्यावर पोलिसांचा बंदोबस्त आहे. या ठिकाणी जाणाऱ्यांची पोलिस कसून चौकशी करतात. परंतु पनवेल परिसरातील नदी, धरण, धबधबे परिसरात जाण्यास बंदी असतानाही पोलिसांची नजर चुकवून काही पर्यटक पाण्याच्या ठिकाणी जातात. या परिसराविषयी माहिती नसणे, पाण्याचा अंदाज न येणे, पोहता न येणे या कारणामुळे या परिसरात आतापर्यंत जवळपास २० पेक्षा जास्त पर्यटकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.
नक्की काय घडलं...
पनवेल तालुका पोलिस ठाणे हद्दीत कुंडी धबधबा येथे आज मुंबई येथील शिवडी, सायन कोळीवाडा, चुनाभट्टी, खारघर येथील 6 मित्र फिरण्यासाठी गेले होते. सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास या सहा जणांपैकी मौसिन मुघल याचा आणि त्याचा मित्र सिद्धेश संजय माने (19) या दोघांचा पाय घसरला आणि ते धबधब्याच्या खड्ड्यात पडले. या दोघांपैकी सिध्देश हा एका मुलाचा पाय पकडल्याने वाचला. परंतु खोल खड्ड्यातील पाण्यात बुडून मौसिनचा मृत्यू झाला.
मौसिनला स्थानिक रहिवासी व अग्निशमन दलाचे जवान यांच्या मदतीने बाहेर काढून पनवेल जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. पण उपचाराआधीच त्याला मृत घोषित केले. मौसिन याचे वडील परदेशात कामाला असून तो एकुलता एक मुलगा होता. कॉलेजच्या कामानिमित्त बाहेर जात असल्याचे सांगून हे सर्व मित्र पनवेल या ठिकाणी फिरण्यासाठी आले होते.
महत्त्वाची बाब म्हणजे, या ठिकाणच्या कुंडी धबधब्यात आत्तापर्यंत 11 जणांचा बुडून मृत्यु झाला आहे. त्यातील मृत पावलेले सर्व तरूण हे त्यांच्या कुटुंबातील एकुलते एक होते अशी माहिती ग्रामस्थांनी दिली.
(संपादन- विराज भागवत)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.