Dombivali Crime : 2 कोटी 81 लाखाची बनावट सोन्याची नाणी देत सराफाला लावला चूना

डोंबिवली मधील सराफाला एका भामट्याने घातला गंडा.
Gold Coins
Gold Coinssakal
Updated on

डोंबिवली - डोंबिवली मधील एका सरफाला मुंबईतील एका भामट्याने बनावट सोन्याची नाणी देत 2 कोटी 81 लाखाला चुना लावल्याची घटना उघडकीस आली आहे. नाणी बनावट असल्याचे निदर्शनास आल्यानंतर सराफाने भामट्याकडे पैसे परत करण्याचा तगादा लावला.

त्याने पैसे परत न केल्याने सराफाने टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. हितेश रमेश गांधी (वय-43) असे सराफाचे नाव असून पमेश सुरेंद्र खिमावत असे लुबाडणूक करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंबिवली पूर्वेतील पांडुरंगवाडी परिसरात सराफ राहण्यास आहेत. हितेश यांच्या परिचयातील रमेश जैन यांनी हितेश यांना तीन महिन्यापूर्वी सांगितले, आपल्या ओळखीतील पमेश खिमावत यांच्याकडे सोन्याची नाणी आहेत. ती त्यांना विकायची आहेत. ही सोन्याची नाणी वालकांबी सुईस कंपनीची असल्याचे रमेश जैन यांनी जवाहिर हितेश यांना सांगितले.

ओळखीच्या व्यक्तिमार्फत सोन्याची नाणी सहज विकत मिळत आहेत म्हणून हितेश यांनी पमेश यांच्याशी व्यवहार करण्याचे ठरविले. ऑगस्ट ते ऑक्टोबर 2024 या तीन महिन्याच्या कालावधीत 3 हजार 700 ग्रॅम वजनाची वालकांबी सुईस कंपनीची वेष्टन बंदिस्त असलेली 37 नाणी 2 कोटी 81 लाख 10 हजार रूपयांना खरेदी केली. प्रत्येक नाणे 100 ग्रॅम वजनाचे होते.

अलीकडे सोन्याचा भाव वाढल्याने या नाणे विक्रीतून आपणास अधिकचा आर्थिक लाभ होईल म्हणून हितेश यांनी रमेश यांच्या मार्फत पमेश यांना काही सोन्याची नाणी विकण्याची मागणी केली. पमेश यांनी असा व्यवहार आपण करत नाही आणि ती सोन्याची नाणी विकू शकत नाही, असे हितेश यांना सांगितले.

त्यामुळे हितेश यांच्या मनात संशय आला. त्यांनी सिलबंद असलेले सोन्याचे नाणे बाहेर काढून ते तपासून घेतले तर ते नाणे बनावट असल्याचे आढळले. हितेश यांनी सर्व नाणी तपासून घेतली ती सर्व नाणी बनावट असल्याचे निष्पन्न झाले.

हितेश यांनी ही सर्व बनावट नाणी परत घेऊन आपले घेतलेले सर्व पैसे परत करण्याचा तगादा पमेश यांच्यामागे लावला. पमेश यांनी हितेश यांना प्रतिसाद देणे बंद केले. आपला विश्वासघात करून आर्थिक फसवणूक केल्याने हितेश यांनी पमेश यांच्या विरुध्द पोलिसांत तक्रार केली आहे. पमेश फरार झाला आहे. पोलिसांनी या गुन्ह्याची कागदपत्रे गुन्हे शाखेच्या साहाय्यक पोलीस आयुक्तांकडे पाठवली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.