मुंबई : महाराष्ट्रात सत्ता बदलणार अशी वातावरणनिर्मिती केली जात असून महायुतीविरोधातील लोकभावनेला गती देण्यासाठी महाविकास आघाडी (मविआ) धक्कातंत्राचा वापर करणार आहे. समरजितसिंह घाटगे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (शरदचंद्र पवार) ३ सप्टेंबरला प्रवेश होणार आहे. त्यानंतर मविआत दर आठवड्यात किमान दोन पक्षप्रवेश होणार आहे, असे पक्षातील एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.