पालघरमध्ये दारू तस्करांचा पोलिसांवर हल्ला; दोन कर्मचारी जखमी

पालघरमध्ये दारू तस्करांचा पोलिसांवर हल्ला; दोन कर्मचारी जखमी
Updated on

तलासरी (पालघर): महाराष्ट्र गुजरात हद्दीवरील संभा या गावातून दमण बनावटीची दारू घेऊन एक वाहन महाराष्ट्रात प्रवेश करत आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारावर तलासरी पोलीस ठाण्यातील चंद्रकांत डांगे आणि मयूर बागल या दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी हे अवैध वाहतूक करणारे वाहन अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दारू तस्करांकडून करण्यात आलेल्या हल्ल्यात दोन्ही पोलीस कर्मचारी जखमी झाले. मिळालेल्या माहितीनुसार, एका इसमाच्या खाजगी वाहनातून शुक्रवारी रात्री 12 वाजता संभा येथे जाऊन या दोन पोलिस कर्मचाऱ्यांनी दारू वाहतूक करणारे वाहन अडविण्याचा प्रयत्न केला. सुरूवातीला तस्करांनी दारूने भरलेली गाडी भरधाव वेगाने पळवली. मात्र पोलिसांनी पाठलाग केलेला पाहता त्यांनी ती गाडी तिथेच सोडली आणि घटनास्थळावरून धूम ठोकली. हेच तस्कर काही वेळाने आसपासचे २० ते २५ लोक घेऊन आले आले आणि त्यांनी पोलीसांवर हल्ला केला.

पोलिसांनी दारू जप्तीची कारवाई करण्यासाठी तलासरी पोलीस स्टेशनला संपर्क साधून जादा कुमक मागविली. पण तातडीने पोलिसांची कुमक त्या ठिकाणी पोहोचू शकली नाही. पोलिसांची कुमक लवकर न आल्याने मधल्या वेळेत दारू तस्करांनी आजूबाजूचे 15 ते 20 साथीदार बोलाविले. थोड्याच वेळात हातात ट्यूब लाईट, दंडुके घेऊन तेथे जमाव आला व घटनास्थळी असलेल्या दोन पोलीस व एक अज्ञात व्यक्तीला त्या जमावाने बेदम मारहाण केली. तसेच, दारूने भरलेले वाहन घेऊन पोबारा केला.

या हल्ल्यात तलासरी पोलीस स्टेशनचे कर्मचारी डांगे गंभीर जखमी झाले. त्याना वापी येथील हरिया रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांवर झालेल्या हल्ल्यानंतर पालघर पोलीस अधिक्षक दत्तात्रय शिंदे व कोकण विभागाचे IG यांनी घटनास्थळी भेट देत माहिती घेतली.

हल्लेखोर दारू माफियांनी चंद्रकांत डांगे याना जबर जखमी करत खाजगी वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. तोडफोड करण्यात आलेले खाजगी वाहन हे डांगे आणि बागल यांच्यासोबत असणाऱ्या तिसऱ्या व्यक्तीचे होते, अशी माहिती आहे. गुन्हा घोलवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला असल्याने घोलवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र याबाबत पोलिसांकडून गुप्तता पाळली जात असल्याचे सांगितले जात आहे.

"हल्ला होण्याचा दोन दिवसांपूर्वीच अवैधपणे वाहतूक होणारा रेशनिंग माल पकडत पोलीस बागल यांनी सेटलमेंट केल्याची बाब समोर आली होती. दारू तस्करीबाबत ही अवि नामक खबऱ्याकडून मिळालेल्या खबरीवर बागल हे खाजगी वाहनातून दारू तस्करांचा पाठलाग करीत होते. दारू तस्करांना जवळच्या घोलवड हद्दीत अडवल्यानंतर घोलवड पोलिसांना का कळविण्यात आले नाही, याबाबत काहींच्या मनात शंका आहे", असा संशय नाव न सांगण्याच्या अटीवर एक इसमाने व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.