मुंबई : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये अवघा 34 टक्के पाणीसाठा जमा असल्याने येत्या बुधवारपासून म्हणजेच पाच तारखेपासून 20 टक्के पाणी कपात लागू होणार आहे. मुंबईला 750 दशलक्ष लिटर पाण्याचा कमी पुरवठा होणार आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातून ड्रोज 3950 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा होतो. त्यातील 3 हजार 750 दशलक्ष लिटर पाणी मुंबईला पुरवले जाते. या सर्व पाणी पुरवठ्यात कपात होणार असून मुंबईला 750 दशलक्ष लिटर कमी पाणी मिळणार आहे. तर ठाणे शहरासह भिवंडी भागातील ज्या भागात पालिकेकडून पाणी पुरवठा होतो त्या भागांनाही 20 टक्के कमी पाणी मिळणार आहे.
मोठी बातमी - देवनार पशुवधगृहात आजपासून धार्मिक कत्तलीला परवानगी
२०२० च्या पावसाळ्यामध्ये जून आणि जुलै महिन्यात मुंबईला पाणीपुरवठा करणा-या तलाव क्षेत्रात सरासरीपेक्षा कमी पर्जन्यवृष्टी झाली आहे. यामुळे जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईतीला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त सुमारे 34.49 टक्के जलसाठा उपलब्ध आहे. सदर जलसाठा जुलै 2019 मध्ये 85.68 टक्के आणि जुलै 2018 मध्ये 83.30 टक्के होता. हीच परिस्थिती यापुढेही राहिल्यास पावसाळा संपल्यानंतरसुद्धा महापालिकेकडे पुरेसा जलसाठा उपलब्ध होऊ शकणार नाही. मुंबईचा पाणीपुरवठा 31 जुलै 2012 पर्यंत सुरळीपणे चालू ठेवण्यासाठी 20 टक्के पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आल्याचे पालिकेच्या जलअभियंता विभागामार्फत सांगण्यात आले.
जपून वापरा पाणी
पाणीसाठा
तलावातील पाणीपातळी (मिटर) पाणीसाठा (दशलक्ष लिटर)
( संपादन - सुमित बागुल )
20 percent water cut declared in mumbai due to lack of rainfall
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.