गृहमंत्री वळसे पाटील यांच्या कार्यालयातील 21 कर्मचारी पॉझिटिव्ह

छगन भुजबळ यांच्या कार्यालयात देखील 22 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
कोरोना पॉझिटिव्ह.
कोरोना पॉझिटिव्ह.sakal
Updated on

मुंबई - राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या कार्यालयातील कोरोना बाधितांती संख्या 21 झाली आहे. दरम्यान, यापूर्वी चार जणांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले होते. त्यानंतर इतर कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यात 17 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे आता कोरोनाबाधितांची संख्या 21 झाली आहे. (State Home Minister Home Minister Dilip Walse Patil ). दरम्यान,छगन भुजबळ यांच्या कार्यालयात देखील 22 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांचे कार्यालयांनाच कोरोनाचा विळखा बसल्याचे उघड झाले आहे. हिवाळी अधिवेशानंतर देखील अनेक राजकीय नेते मंडळी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. (Staff Members of Office Home Minister Dilip Walse Patil Found Covid Positive )

कोरोना पॉझिटिव्ह.
चार्टर्ड फ्लाइटमधील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांचा रूग्णालयातून पोबारा

राज्यात गरजेनुसार निर्बंध वाढवा : शरद पवार

कोरोना संसर्ग, रुग्णसंख्या, त्यातील वाढ आणि परिणामांची माहिती घेत खबरदारी म्हणून योग्य वेळी, योग्य निर्णय घ्यावा व गरज असेल तर निर्बंध वाढविण्याची सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी राज्य सरकारला केल्याचे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी गुरुवारी सांगितले. लोकांची गर्दी आणि वाढत्या रुग्णसंख्येविषयी चिंता व्यक्त करताना राजकीय व अराजकीय कार्यक्रम थांबविण्याबाबत पवार यांनी बजावल्याचेही सांगण्यात आले.

कोरोना पॉझिटिव्ह.
'देशसेवेसाठी मला पुन्हा पुन्हा भारतात जन्म घ्यायचाय असं देशबंधू म्हणायचे'

पवार यांच्या सूचनेनंतर आता राज्य सरकार तातडीने पावले उचलून उपाय करणार असल्याचे स्पष्ट होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टोपे यांनी पवार यांची भेट घेतली. राज्यातील या आजाराची प्रमुख्याने रुग्णवाढीची कारणे, त्याचे प्रमाण, सरकारने केलेल्या उपाययोजना, सरकारी, खासगी रुग्णांतील उपचार व्यवस्था, संभाव्य निर्बंध आणि त्याची परिणामकारकता या बाबींवर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.

कोरोना पॉझिटिव्ह.
मंदिरे पुन्हा बंद होतील का? राजेश टोपेंनी दिलं उत्तर

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत धार्मिक स्थळ पूर्णपणे बंद होती. पण, नवरात्रीच्या मुहूर्तावर मंदिरे उघडण्यात आली होती. आता पुन्हा कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे धार्मिक स्थळं आणखी बंद होतील का? अशी भीती आहे. त्याबाबत राजेश टोपे यांनी स्पष्टीकरण दिलं असून सर्वच धार्मिक स्थळांवर गर्दी टाळावी लागेल. सर्वत्र गर्दी टाळण्याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. आपआपल्या कडक लॉकडाऊन करायचं नाही. पण, गर्दी होऊ नये यासाठी राज्य सरकार आग्रही आहे, असं राजेश टोपे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.