Aadhaar Card for Stray Dogs : मुंबई विमानतळावरील २० भटक्या श्वानांना मिळालं 'आधार कार्ड'; क्यूआर कोडने पटणार ओळख

श्वानांना देण्यात आलेले क्यूआर कोड हा पायलेट प्रोजेक्ट असणार आहे.
Aadhaar Card for Stray Dogs
Aadhaar Card for Stray DogseSakal
Updated on

मुंबई महापालिकेने भटक्या श्वानांसाठी एक नवीन मोहीम सुरू केली आहे. या अंतर्गत मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावरील २० भटक्या श्वानांना ओळखपत्र देण्यात आलं आहे. या श्वानांच्या गळ्यामध्ये हे ओळखपत्र लटकवण्यात आलं आहे.

या ओळखपत्रामध्ये एक क्यूआर कोड असणार आहे. हा क्यूआर कोड स्कॅन केल्यावर या श्वानाची सर्व माहिती मिळेल. या श्वानाचं नाव, मिळालेल्या लसी, नसबंदी आणि इतर वैद्यकीय माहिती यामध्ये मिळेल. यासोबतच, या श्वानाचा फीडर कोण आहे हेदेखील यात कळेल.

Aadhaar Card for Stray Dogs
Dangerous Dogs : कुत्र्यांच्या सगळ्यात खतरनाक जाती, सिंहालाही फाडून खातील!

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, बीएमसी आणि पॉ-फ्रेंड नावाच्या एका संस्थेने ही मोहीम राबवली आहे. श्वानांसाठी विशेष ओळखपत्रं तयार करण्याचं कामही याच संस्थेने केलं आहे. सायनमध्ये राहणाऱ्या अक्षय रिडलान नावाच्या इंजिनिअरने या मोहिमेची सुरुवात केली.

क्यूआर-कोडचा फायदा

गळ्यामध्ये क्यूआर कोड असल्यामुळे या श्वानांवर नजर ठेवणं सोपं जाणार आहे. एखादा श्वान बेपत्ता झाल्यास त्याला ट्रॅक करणं यामुळे शक्य होणार आहे. पाळीव प्राण्यांसाठीही अशा प्रकारचे क्यूआर कोड तयार करून घेणं भरपूर फायद्याचं आहे. तर, भटक्या श्वानांची माहिती गोळा करण्यासाठी बीएमसीला याचा फायदा होणार आहे.

Aadhaar Card for Stray Dogs
Supreme Court on Stray Dogs Issue : भटक्या कुत्र्यांना इच्छामरण देण्याबाबत सुप्रीम कोर्टाचा महत्वाचा निर्णय

बांद्र्यात राहणाऱ्या सोनिया शेलार या दररोज सुमारे ३०० भटक्या श्वानांना खाऊ घालतात. यामध्ये विमानतळाच्या परिसरातील श्वानांचा समावेशही आहे. सोनिया यांनी या अभियानासाठी भरपूर मदत केली. त्यांनी श्वानांना आपल्याकडे बोलावले, आणि त्यावेळी बीएमसीच्या पशुवैद्यांनी या श्वानांचे लसीकरण केले. यासोबतच, तपासणीनंतर पॉ-फ्रेंड संस्थेच्या कर्मचाऱ्याने श्वानाला टॅग लावला.

पायलेट प्रोजेक्ट

सध्या जेवढे श्वान पकडले आहेत, त्या सर्वांची नसबंदी करण्यात आली आहे. एअरपोर्टच्या बाहेरील श्वानांना देण्यात आलेले क्यूआर कोड हा पायलेट प्रोजेक्ट असणार आहे. यानंतर हळू हळू इतर भागामध्ये अशा प्रकारचे प्रकल्प राबवण्यात येणार आहेत.

Aadhaar Card for Stray Dogs
Tommy Dog : मालकासाठी गाठले टॉमीने थेट ‘आयसीयू’; तीन दिवस उपाशी राहून घेतली भेट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()