Mumbai Local News: गर्दीमुळे धावत्या लोकलमधून पडल्याने 20 वर्षांच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

Mumbai Local Accident: डोंबिवली आणि कोपरदरम्यान तो लोकलमधून पडला आणि गंभीर जखमी झाला.
Mumbai Local
Mumbai Local Accidentesakal
Updated on

Latest Mumbai News: लोकलमधील गर्दीमुळे धावत्या लोकलमधून पडून डोंबिवलीतील एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना घडली असून, आयुष दोषी असे मृत तरुणाचे नाव आहे.

डोंबिवली पश्चिमेतील ठाकूरवाडी परिसरातील मधुकुंज इमारतीमध्ये राहणारा 20 वर्षांचा आयुष मुलुंडमधील एका कॉलेजमध्ये डिप्लोमा करत होता. नेहमीप्रमाणे मंगळवारी आयुष डोंबिवली रेल्वे स्थानकात पोहोचला. मुंबईकडे जाणारी 8.15 ची लोकल पकडली. डोंबिवली आणि कोपरदरम्यान तो लोकलमधून पडला आणि गंभीर जखमी झाला.

Mumbai Local
Mumbai Local Mega Block:मुंबईकरांनो लक्ष द्या; आजपासून दोन दिवस विशेष मेगाब्लॉक!

जखमी आयुषला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्याआधीच आयुषचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. आयुषच्या मृत्यूनंतर दोषी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

डोंबिवलीमधील अनेक प्रवाशांना लोकलमधील गर्दीमुळे आपला जीव गमवावा लागत आहे. दोन तीन महिन्याभरापूर्वी दुबे नावाचा डोंबिवली मधील रहिवाशी याचा लोकलमधून पडून मृत्यू झाला होता.

आता आयुषच्या मृत्यूनंतर डोंबिवलीकरांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण आहे. आयुष ची घटना समजताच डोंबिवलीतील माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे हे आयुषच्या घरी पोहोचले. डोंबिवली ते मुंब्रादरम्यान दररोज अपघात होतात रेल्वे आणखी किती डोंबिवलीकरांचा बळी घेणार, असा सवाल दिपेश म्हात्रे यांनी यावेळी उपस्थित केला.

Mumbai Local
Mumbai Local: नवीन वेळापत्रकामुळे रेल्वे प्रवाशांची दाणादाण!

रेल्वे प्रवासी संघटनाकडून रेल्वे गाड्या वाढवण्याची मागणी सातत्याने होत आहे. अपघात थांबवण्यासाठी रेल्वेने त्वरित उपाययोजना केली पाहिजे, अशी मागणी होत आहे. परंतु रेल्वेकडून अजून यासंदर्भात ठोस पाऊल उचलले जात नाही, त्यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी आहे. रेल्वे प्रशासनाच्या आकडेवारी नुसार, जानेवारी महिन्यात 171, फेब्रुवारी महिन्यात 152, मार्च महिन्यात 165, एप्रिल महिन्यात 179, मे महिन्यात 182, जून महिन्यात 135 तर जुलै महिन्यात 177 प्रवाशांनी जीव गमावला आहे. यात चालत्या लोकल मधून पडल्याने, उतरताना धक्का लागल्याने किंवा पाय घसरून पडल्यामुळे तर कधी रेल्वे ट्रॅक ओलांडताना मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

Mumbai Local
Mumbai Local News: आपत्कालीन ब्लॉकमुळे आठ लोकल रद्द, प्रवाशांचे हाल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.