Malegaon Bomb Blast Case : 2008 मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण: सुनावणीसाठी खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर NIA कोर्टात हजर

2008 मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात मुंबईतील विशेष एनआयए न्यायालयात खटल्याची सुनावणी
2008 Malegaon blast case MP Pragya Singh Thakur appears in NIA court for hearing
2008 Malegaon blast case MP Pragya Singh Thakur appears in NIA court for hearingPragya Singh Thakur
Updated on

मुंबई : 2008 मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात मुंबईतील विशेष एनआयए न्यायालयात खटल्याची सुनावणी झाली. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील एक आरोपी खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर सोमवारी विशेष एनआयए न्यायालयात विशेष न्यायाधीश लाहोटीसमोर सुनावणीसाठी हजर झाल्या. मागील सुनावणीत विशेष न्यायालयानं 25 सप्टेंबर रोजी खटल्यातील सर्व आरोपींना हजर राहण्याचे निर्देश दिले होते.

मात्र सर्व आरोपी सोमवारी वेळेत हजर नव्हते. त्यापैकी आरोपी क्रमांक 1 प्रज्ञासिंह ठाकूर या उशिरा मदुपारी 2 नंतर न्यायालयात हजर झाल्या. परिणामी न्यायालयानं त्यांना विचारणा केली. त्यावर तब्येत बिघडल्याच उशीर झाल्याचं त्यांनी नमूद केलंय. माझ्या आजारपणाचा विचार करून योग्य ती तारीख द्यावी, अशी विनंती ठाकूर यांनी विशेष न्यायालयाकडे केली आहे.

न्यायधिधांची तंबी

सोमवारी मुंबईतील विशेष एनआयए न्यायालयात न्यायाधीश लाहोटी यांनी 2008 मालेगाव ब्लास्ट प्रकरणी सुनावणी केली. न्यायाधीश लाहोटीनी हजर नसलेल्या आरोपींच्या संदर्भात विचारणा केली असता आरोपी सुधाकर द्विवेदीसह इतर आरोपी हजर नव्हते. त्यांच्या वकिलांना न्यायाधीशांनी कडक शब्दात बजावत 3 ऑक्टोंबर रोजी सर्व आरोपींना हजर राहण्यास सांगितले.

2008 Malegaon blast case MP Pragya Singh Thakur appears in NIA court for hearing
Mumbai Crime : वाहतुक पोलिसाने कारवाई केली म्हणून हेल्मेटने हल्ला; आरोपी दुचाकीचालकाला अटक

सोमवारी सर्व आरोपी हजर नसल्यामुळं कलम 313 अंतर्गत आरोपींचे जबाब नोंदवणं, आरोपांवर त्यांचा प्रतिसाद नोंदवणं न्यायालयाला करता आले नाहीत. 3 ऑक्टोंबरपासून सुनावणी नियमित सुरू होणार असून सीआरपीसी 313 अंतर्गत जबाब नोंदवण्यात येणार असल्याचे न्यायालयानं नमूद केले आहे

300 साक्षीदारांची साक्ष

मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात 300 पेक्षा अधिक साक्षीदारांची साक्ष नोंदवली गेलीय आहे. या प्रकरणी साक्षीदारांची साक्ष नोंदणी एनआयएकडून पूर्ण करण्यात आली आहे. आता विशेष न्यायालयानं सोमवारी त्या संदर्भात सर्वच आरोपींना 3 ऑक्टोंबर 2023 रोजी हजर राहण्याचे आज निर्देश दिले आहेत. विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती ए. के. लाहोटी यांच्या न्यायालयात ही सुनावणी पार पडणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()