Railway News: फुकट्यांवर पोलिसांवर मोठी कारवाई; केली तब्बल इतक्या कोटींची वसुली

२०२३-२४मध्ये ४६ कोटी फुकट्यांकडून ३०० कोटीची दंड वसुलीच
tc railway news
tc railway newssakal
Updated on

Mumbai News: भारतीय रेल्वेचे जाळे देशभर पसरले आहे, त्याच मध्य रेल्वेचा आवाका सर्वाधिक जास्त असल्याने फुकट्या प्रवाशांचा फटकाही मध्य रेल्वेला बसताना दिसत आहे.

२०२३-२४ आर्थिक वर्षात ४६.२६ लाख फुकट्या प्रवाशांवर मध्य रेल्वेने कारवाई करत त्यांच्याकडून ३०० कोटी रुपयांच्या दंड वसूल केला आहे. फुकट्या प्रवाशांवर कारवाईमध्ये भारतीय रेल्वेच्या सर्व विभागामध्ये मध्य रेल्वे आघाडीवर असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहेत.

विना तिकीट आणि अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी मध्य रेल्वे उपनगरीय, मेल एक्स्प्रेस, प्रवासी सेवा आणि विशेष गाड्यांमध्ये नियमितपणे तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली होती.

tc railway news
Kokan Railway: गणेशोत्सवानिमित्त भक्तांसाठी १० मेपासून आरक्षण खुले; सप्टेंबरपासून उत्सवाची धामधूम

या मोहिमेत मध्य रेल्वेच्या तिकीट तपासणी पथकाने आर्थिक वर्ष २०२३-२४ (एप्रिल २०२३ ते मार्च-२०२४) मध्ये ४६.२६ लाख प्रकरणांवर दंडात्मक कारवाई करून ३०० कोटींहून अधिक कमाईसह मध्य रेल्वेने तिकीट तपासणी कामगिरीमध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे.

मध्य रेल्वेने २६५.९७ कोटी महसुलाच्या बाबतीत या वर्षीचे लक्ष्य १२.८० टक्क्यांनी ओलांडले आहे आणि एकूण ४२.६३ लाख प्रकरणांमध्ये ८.३८ टक्के लक्ष्य पार केले असून प्रकरण आणि कमाईच्या बाबतीत सर्व विभागामध्ये प्रथम क्रमांकावर आहे.

tc railway news
Mumbai Railway : रेल्वे वाहतुकीचे तीन तेरा! ओव्हरहेड वायरमध्ये पेंटाग्राप अडकला

विभाग प्रकरणे महसूल

मुंबई २०.५३ लाख ११५.२९ कोटी

भुसावळ ८.३४ लाख ६६.३३ कोटी

नागपूर ५.७० लाख ३४.५२ कोटी

सोलापूर ५.४४ लाख ३४.७४ कोटी

पुणे ३.७४ लाख २८.१५ कोटी

tc railway news
Central Railway News : मध्य रेल्वेकडून 89.24 दशलक्ष टन मालवाहतूक! 9446 कोटीचा महसूल

सुनील नैनानी, प्रवासी तिकीट निरीक्षक-------मुंबई------२०,११७ फुकट्यांकडून १ कोटी ९२ लाख रु

एम एम शिंदे- मुख्य तिकीट निरीक्षक-----------मुंबई -------१८हजार २२३फुकट्यांकडून १ कोटी ५९ लाख रु

धर्मेंद्र कुमार- प्रवासी तिकीट निरीक्षक----------मुंबई------१७हजार ६४१ फुकट्यांकडून १कोटी ५२ लाख रु

रुपाली माळवे-महिला वरिष्ठ तिकीट परीक्षक----------पुणे -----१५ हजार फुकटयांकडून १ कोटी ३१ लाख रु

मनीषा चाकणे-महिला एचडी. तिकीट परीक्षक---- पुणे- १३ हजार फुकट्यांकडून १ कोटी २१ लाख रु

tc railway news
QR Code for Railway Fine: आता क्युआर कोडने रेल्वे प्रवाशांकडून दंड वसूल, टीसींना हँड हेल्ड टर्मिनल मशिनमध्ये सुविधा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.