ठाणे : कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाने , मोठ्या प्रमाणात रुग्णालयांमधील बेड्स अपुरे पडू लागले आहेत. त्यात परदेशातून मायदेशात परतणारे नागरिक, त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती, सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांच्या अथवा संशयितांच्या घरात स्वतंत्र खोलीसह स्वच्छतागृह आहे, अशांना आरोग्य प्रशासनाकडून होम क्वारंटाइनची व्यवस्था करून देण्यात येते. त्यानुसार मागील सहा महिन्यात सुमारे 22 लाख नागरिक होम क्वारंटाईन झाले असून, त्यापैकी 11 लाख नागरिकांनी आपला क्वारंटाईनचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण केला आहे. त्यात जिल्ह्यातील सहा महापालिका व ग्रामीण भागात प्रतिदिन सुमारे 15 ते 20 हजार नागरिकांना होम क्वारंटाईन होत असल्याचे समोर आले आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यातील आरोग्य विभागासह महसूल विभागातील कर्मचारी, पोलिस प्रशासन अहोरात्र मेहनत घेत आहेत. जिल्ह्यात देखील बाधितांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे. तरीही रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे रुग्णालयातील बेड्स अपुरे पडत आहेत. बेड्सअभावी रुग्णांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यानुसार ज्या रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आढळून येणारे रुग्ण, ज्या रुग्णांना काहीच त्रास होत नसेल असे रुग्ण, त्यात जिल्ह्यातून परदेशात गेलेले विद्यार्थी व नागरिकांना आरोग्य विभागाकडून होम क्वारंटाईनचा सल्ला देण्यात येत असतो.
त्यानुसार जिल्ह्यात प्रतिदिन सुमारे 15 ते 20 हजार नागरिकांना होम क्वारंटाईन करण्यात येत असल्याची माहिती शासकीय आकडेवारीवरून समोर आली आहे. मार्च महिन्यापासून सप्टेंबरपर्यंत 21 लाख 55 हजार 22 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले. तर, 10 लाख 75 हजार 310 नागरिकांनी त्यांचा 14 दिवसांचा होम क्वारंटाईनचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. तर, दोन लाख 29 हजार 426 जण वैद्यकीय पथकांच्या देखरेखीखाली होम क्वारंटाईन आहेत.
यामध्ये सर्वाधिक कल्याण-डोंबिवलीत आठ लाख 47 हजार 551 नागरिकांना होम क्वारंटाईन करण्यात आले असून त्याखालोखाल ठाणे महापालिका क्षेत्रातील चार लाख 85 हजार 550 तर, नवी मुंबईतील चार लाख 67 हजार 258 नागरिकांना होम क्वारंटाईन करण्यात आले. यापैकी बहुतांश नागरिकांनी आपला 14 दिवसांचा होम क्वारंटाइनचा कार्यकाळ पूर्ण केला आहे.
क्षेत्र | होम क्वारंटाइन नागरिकांची संख्या | 14 दिवसांचा कार्यकाल पूर्ण केलेल्यांची संख्या |
ठामपा 485550 384623
मीरा भाईंदर 42108 389
नवी मुंबई 467258 426502
कल्याण डोंबिवली 847551 557
भिवंडी 28975 306
उल्हासनगर 101063 99329
अंबरनाथ 67683 51840
बदलापूर 33832 28470
ठाणे ग्रामीण 81002 83294
.......................................................................
एकूण 21155022 1075310
----------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.