मंगलमय, चैतन्यदायी वातावरणात पार पडलेल्या गणेशोत्सवाची आज सांगता होणार आहे. आज अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने गणरायाचे विसर्जन होणार आहे. गणेश मंडळांनीही विसर्जन मिरवणूक मोठ्या दिमाखात आणि पारंपरिक पद्धतीने काढण्यासाठी जय्यत तयारी केली आहे.
विसर्जन मिरवणुकीसाठी विविध मंडळांचे खास रथ तयार केले आहेत. ढोल-ताशा पथके, शंखनाद, बँड पथके सज्ज झाले आहे. प्रमुख मंडळांनी विसर्जन मिरवणुकीसाठी खास नियोजन केले आहे.
दरम्यान मुंबईकरांना या विसर्जन मिरवणुकीचा मनसोक्त आनंद लुटता येणार आहे. कारण रेल्वे प्रशासनाने आज गणेश भक्तांची गैरसोय टाळण्यासाठी 22 जादा गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.