Mumbai News : मुंबईतील दरडींच्या दाढेतील 22 हजार झोपड्यांवर भितीचे सावट

मुंबईत तब्बल २९१ ठिकाणी दरडींचा धोका असून त्यातील २०० हून अधिक ठिकाणं कुर्ल्यापासून मुलूंड पश्चिम पर्यंत भागातील.
Slums in Mumbai
Slums in Mumbai Sakal
Updated on

मुंबई - मुंबईत तब्बल २९१ ठिकाणी दरडींचा धोका असून त्यातील २०० हून अधिक ठिकाणं कुर्ल्यापासून मुलूंड पश्चिम पर्यंतच्या भागातील आहेत. दाढेतील 22 हजार झोडपड्या दरडींच्या झोपड्यांना भितीचे सावट कायम आहे.

इर्शाळवाडी येथे काल मध्यरात्री डोंगर खचल्याने झालेल्या दुर्घटनेने मृत आणि जखमींचा आकडा वाढत आहे. सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मुंबईत तब्बल २९१ ठिकाणी दरडींचा धोका असल्याने पालिकेने संबंधित रहिवाशांना खबरदारीची उपाययोजना म्हणून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत होण्यासाठी पावसाळ्याआधी दरवर्षी प्रमाणे यंदाही नोटीसा बजावल्या.

दरडींच्या धोकादायक असलेल्या एकूण ठिकाणांपैकी २०० हून अधिक ठिकाणेही कुर्ल्यापासून मुलूंड पश्चिम पर्यंतच्या भागातील आहेत. मात्र या भागातील सर्वाधिक जमिनीची मालकी जिल्हाधिकारी, वन विभाग, महसूल विभाग, आणि म्हाडासारख्या आस्थापनांची असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. गेल्या वर्षी दरडी कोसून ३२ नागरिकांचा मृत्यू झाला. या पावसाळ्यातही दरडींचे भय कायम आहे.

दरडींची ठिकाणे

विक्रोळीपासून भांडूप पश्चिम पर्यंत तब्बल १३२ आणि घाटकोपर मध्ये ३२ ठिकाणे धोकादायक आहेत. कुर्ला येथे १८ ठिकाणी दरड कोसळण्याचा धोका आहे. मुलुंड येथील ५ ठिकाणे, देवनार परीसरात ११, मालाडमध्ये १८ आणि मलबार हिल, ताडदेव परिसरात १६ अशी धोकादायक ठिकाणे आहेत.

स्थलांतराची शिफारस

मुंबईतील ३६ पैकी २५ मतदारसंघात २९१ ठिकाणे ही डोंगराळ भागातील धोकादायक म्हणून जाहीर झाली आहेत. त्या ठिकाणी अजूनही २२,४८३ झोपड्यांपैकी ९,६५७ झोपड्यांना इतरत्र स्थलांतरित करण्याची शिफारस मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाने यापूर्वी राज्य सरकारकडे केली आहे. मात्र राज्यसरकारने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. झोपड्यांकडील टेकड्यांच्या आजूबाजूस संरक्षक भिंत बांधण्याचीही शिफारस केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.