मुंबई : आशियातील सर्वात मोठा कल्चरल फेस्टिव्हल समजल्या जाणाऱ्या आयआयटी मुंबईच्या ‘मूड इंडिगो’ची सुरुवात गुरुवारपासून (ता. २२) होत आहे. २६ ते २९ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या फेस्टिव्हलमध्ये २३० पेक्षा अधिक कार्यक्रमांची मेजवानी असणार आहे.
शैक्षणिक वृत्त सीईटी परीक्षेची गुणपद्धती जाहीर
यामध्ये देशी, विदेशी कलाकारांचे कॉन्सर्ट, चर्चासत्र व विविध स्पर्धांचा समावेश आहे.
आयआयटी मुंबईमध्ये होणाऱ्या ४९ व्या मूड इंडिगोमध्ये देशातील १७०० महाविद्यालयातील १ लाख ४३ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी सहभाग घेणार आहेत. चार दिवस चालणाऱ्या मूड इंडिगोमध्ये कलाकार अमित त्रिवेदी, शंकर एहसान लॉय, प्रीतम, आशा भोसले, विशाल शेखर, सलिम सुलेमान, सोनू निगम, कैलाश खेर यांचे कॉन्सर्ट होणार आहे; तर परदेशातील द हकेन, पोर्कुपाईन ट्री, सिम्पल प्लॅन आणि डीजे विनाई यांचे कॉन्सर्ट होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना देशीबरोबरच विदेशी संगीतकारांच्या गाण्यांचा अनुभव घेता येणार आहे.
महत्वाचे ठाण्यात मद्यपी कॅमॅऱ्यांच्या रडारवर
त्याचप्रमाणे लिटफेस्टमध्ये पी. चिदंबरम, नारायण मूर्ती, अर्णब गोस्वामी, देवेंद्र फडणवीस, बॉलीवूड अभिनेते अक्षय कुमार, आमीर खान, नसरुद्दीन शहा, मनोज वाजपेयी यांच्याशी विद्यार्थ्यांना संवाद साधता येणार आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी रॉक बॅण्ड स्पर्धा, डान्स स्पर्धा, फेस पेंटिंग स्पर्धा, टाकाऊपासून उत्कृष्ट वस्त्रे बनवण्याची ट्रॅशन स्पर्धा, फोटोग्राफी स्पर्धा, देसी बिट्स, जस्ट अ मिनिट्स, संस्कृती अशा विविध स्पर्धांचे या वेळी आयोजन करण्यात येणार आहे.
अनेक विक्रमांची नोंद
१९७१ मध्ये मूड इंडिगोला प्रारंभ झाला तेव्हापासून या फेस्टमध्ये अनेक जागतिक विक्रम करण्यात आले आहेत. २०१३ च्या फेस्टिव्हलमध्ये सर्वाधिक नागरिकांनी ओरियो बिस्कीट चहामध्ये बुडवून खाल्ले होते; तर २०१६ मध्ये जगातील सर्वात मोठे जमिनीवरील थ्रीडी चित्र काढण्यात आले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.