मुंबई, ता. १६ : मुंबईत भौगोलिक परिस्थितीमुळे चौवीस तास पाणी देणे मुंबई महापालिकेला अशक्य आहे. पाण्याचे नवे स्रोत अपूर्ण आहेत. त्यामुळे गारगई आणि पिंजाळ हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर चोवीस तास पाणी देणे शक्य होईल, त्यासाठी काही वर्षे प्रतीक्षा करावी लागणार असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली.