मुंबईत कोरोना बाधित रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. राज्यातील सर्वाधिक रुग्णसंख्या मुंबईत वाढत असून राज्यातील सर्वाधिक पॉझिटिव्हीटी दर देखील मुंबईत नोंदवण्यात आला आहे.
मुंबई - मुंबईत कोरोना बाधित (Corona Affected) रुग्णसंख्या (Patient) वेगाने वाढत आहे. राज्यातील सर्वाधिक रुग्णसंख्या मुंबईत (Mumbai) वाढत असून राज्यातील सर्वाधिक पॉझिटिव्हीटी दर देखील मुंबईत नोंदवण्यात आला आहे.
मुंबईत रुग्णवाढीची गती वाढली असून आठवड्याभरात 7443 नवीन रुग्णांची भर पडली. आठवड्याभरात 247.97 टक्के रुग्णवाढ झाली आहे. मुंबईतील पॉझिटिव्हीटी दर ही वाढला असून 3.97 टक्क्यांवर गेला आहे.
सक्रिय रुग्णांमध्ये देखील मुंबई राज्यात अव्वल आहे. आठवडयाभरात सक्रिय रुग्ण 2419 वरून 8060 वर पोचले. राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांपैकी 57.31 टक्के सक्रिय रुग्ण केवळ मुंबईत आहेत.सक्रिय रुग्णांमध्ये 233.20 टक्के वाढ झाली आहे.
एकूण नवीन रुग्ण
क्षेत्र नवीन रुग्ण % वाढ
मुंबई - 7443 247.57
ठाणे - 1815 128.58
पालघर - 270 50.84
रायगड - 371 124.85
रत्नागिरी - 30 42.86
सक्रिय रुग्ण
सक्रिय रुग्ण % वाढ
मुंबई - 8060 57.31
पुणे - 2053 14.60
ठाणे - 1638 11.65
नाशिक - 421 2.99
अहमदनगर - 385 2.74
पॉझिटिव्हीटी दर
मुंबई - 2.97
पुणे - 2.32
सांगली - 2.08
ठाणे - 1.74
रायगड - 1.62
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.