मोठी बातमी - २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर हुसैन राणा याला अमेरिकेत अटक...

मोठी बातमी - २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर हुसैन राणा याला अमेरिकेत अटक...
Updated on

मुंबई - २००८ मध्ये झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर हुसैन राणा याला अमेरिकेत अटक करण्यात आलीये.  भारताच्या प्रत्यार्पणाच्या मागणीनंतर अमेरिकेने मोठी कारवाईकेली गेलीये. त्यामुळे लवकरच राणा याला भारताच्या हवाली करण्यात येणार असल्याचं समजतंय.

२००८ मध्ये झालेल्या २६/११ च्या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर हुसैन राणा याला २००९ मध्ये अमेरिकेत पकडण्यात आलं होतं. मुंबई दहशतवादी हल्ल्यात अमेरिकी नागरिकही मारले गेले होते, त्यामुळे तिथे त्याच्यावर खटला चालला गेला. काही दिवसांपूर्वीच तहव्वूर हुसैन राणा हा मुंबई दहशतवादी हल्ल्याप्रकरणीची अमेरिकेतील चौदा वर्षांची शिक्षा भोगून सुटला होता.

दरम्यान आता तहव्वूर हुसैन राणा याला आता पुन्हा एकदा अटक करण्यात आली आहे. अमेरिकेतील लॉस एंजलिसमध्ये त्याला अटक करण्यात आली आहे. भारताने तहव्वूर हुसैन राणा याच्या प्रत्यार्पणाची मागणी केली आहे. या मागणीला अमेरिकेकडून पूर्णपणे सहकार्य करण्यात येणार असल्याचं ट्रम्प प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. त्यामुळे सूत्रांकडून मिळलेल्या माहितीनुसार आता तहव्वूर हुसैन राणा याला भारताच्या हवाली केलं जाणार आहे. 

२००८ च्या मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्यापूर्वी तहव्वूर हुसैन राणा नोव्हेंबर महिन्यातच डेव्हिड हेडलीचा साथीदार म्हणून एका महिलेसोबत भारतात आला होता. तो कोचीतही गेला होता. तहव्वूर हुसैन राणासोबत असलेल्या महिलेचं नाव समराझ हुसेन असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. तहव्वूर हुसैन राणा हा कॅनडातील इमिग्रेशन कन्सल्टंट म्हणून कोचीत आला होती, तशी जाहिरात त्याने कोचीतल्या वर्तमान पत्रांमध्ये दिली होती. कॅनडात जाणार्यांना विझा देण्यासाठी तो कोचीत येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी त्यादिशेने तपासही सुरु केला होता. यानंतर दुसऱ्या दिवशी तो मुंबईत परतला होता.   

दरम्यान, २६/११ मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर हुसैन राणा याला भारतात आणण्याची  प्रक्रिया जटिल असून त्यासंबंधात कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी काही वेळ लागू शकतो. भारतीय परराष्ट्र मंत्रालय, विधी आणि न्याय मंत्रालय त्याचसोबत गृह मंत्रालयाची अमेरिकी परराष्ट्र मंत्रालय, विधी आणि न्याय मंत्रालय सोबतच गृह मंत्रालयातील या दोघांची काम करण्याची पद्धत आणि प्रक्रिया वेगवेगळ्या असल्याने प्रत्यार्पणाची प्रोसेस गुंतागुंतीची असल्याचं समजतंय. 

26 11 mumbai terror attack mastermind tahawwur hussain rana arrested in US

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.