Mumbai: शाळेच्या लिफ्टमध्ये अडकून २६ वर्षीय शिक्षिकेचा मृत्यू, घटनेने हळहळ...

लिफ्टमध्ये प्रवेश करताना घ्या विशेष काळजी, नाहीतर तुमचाही जीव येऊ शकतो धोक्यात
Mumbai malad Accident
Mumbai malad Accidentesakal
Updated on

Lift Accident: मुंबईच्या वेस्ट मलाडमधील सेंट मेरी इंग्लिश स्कूलमधील एक धक्कादायक घटना पुढे आली आहे. एका २६ वर्षीय शिक्षिकेचा शाळेच्या लिफ्टमध्ये अडकून दुर्दैवी मृत्यू झालाय. शिक्षिकेला रूग्णालयात नेताच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. जेनेस फर्नांडीस असे तिचे नाव आहे.(Mumbai malad lift Accident)

मुंबईच्या सेंट मेरी इंग्लिश स्कूलमधील एक शिक्षिका लिफ्टने सहाव्या फ्लोअरवरून दुसऱ्या फ्लोअरवर जाण्यासाठी लिफ्टमध्ये प्रवेश करत असताना अचानक लिफ्टमध्ये तिचा एक पाय अडकला. लिफ्टमध्ये शिक्षिकेचा एक पाय बाहेर आणि एक पाय लिफ्टच्या आत होता. तसेच लिफ्ट एकदम वरच्या दिशेने वर चढू लागली. लिफ्ट आणि भिंतीच्या मध्ये चेपल्याने तिला गंभीर ईजा झाली अन् तिचा मृत्यू झालाय. कर्मचाऱ्यांना घटनेची चाहूल लागताच त्यांनी लिफ्टकडे धाव घेत शिक्षिकेला लिफ्ट कॅबिनमधून कसेबसे बाहेर काढले.

Mumbai malad Accident
Gujrat Accident : इमारतीची लिफ्ट कोसळून आठ मजूरांचा मृत्यू; एक जखमी

मलाड पोलीसांनी सध्या शिक्षिकेच्या अकस्मात मृत्यूची नोंद केली असून लिफ्ट कंपनीची विचारपूस केली आहे. सोबतच शाळेतील इतर कर्मचाऱ्यांनाचाही जबाब नोंदवला आहे.

लिफ्टमध्ये प्रवेश करताना घ्या विशेष काळजी

लिफ्टमध्ये प्रवेश करतेवेळी अनेकांचे लक्ष मोबाईलमध्ये असते. यादरम्यान तुमच्यासोबत अशा दुर्घटना घडू शकतात. त्यामुळे वेळेत सावध व्हा आणि लिफ्टमध्ये प्रवेश करताना तुमच्या आजूबाजूला लक्ष असू द्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.