Kuwaiti Vessel in Mumbai: कुवेतहून आलेली नौका मुंबईजवळ संशयास्पदरित्या फिरताना आढळली; तिघांची चौकशी सुरु

Kuwaiti vessel police investigating : कुवेतहून आलेली एक मासेमारी नौका पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. तामिळनाडूस्थित तीन जण या नौकेवर सापडले असून त्यांची चौकशी केली जात आहे.
Kuwaiti Vessel in Mumbai
Kuwaiti Vessel in Mumbai
Updated on

मुंबई- कुवेतहून आलेली एक मासेमारी नौका पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. तामिळनाडूस्थित तीन जण या नौकेवर सापडले असून त्यांची चौकशी केली जात आहे. दक्षिण मुंबईतील ससून डॉकजवळील समुद्र किनारी मंगळवारी पहाटे मासेमारी नौका संशयास्पदरित्या फिरताना आढळली. या घटनेनंतर, मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

यलो गेट पोलिसांच्या गस्ती नौकेला ससून डॉकजवळ मासेमारी करणारी नौका प्रथम दिसली. त्यानंतर, केलेल्या चौकशीत ही नौका कुवेतहून आल्याचे समोर आले.सध्या ही नौका गेटवे ऑफ इंडिया येथे नेण्यात आली असून तेथे उभी करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. (3 persons from tamilnadu travel to Mumbai undetected in Kuwaiti vessel police investigating)

Kuwaiti Vessel in Mumbai
Navi Mumbai: अनधिकृत इमारतींवर टांगती तलवार; उच्च न्‍यायालयाकडून कारवाईचे आदेश

उपायुक्त संजय लाटकर यांनी सांगितलं की, पेट्रोलींगला असलेल्या पोलिसांना कुवेतची एक नौका संशयास्पदरित्या फिरताना आढलली. या नौकेवर तीन व्यक्ती होते. त्यांना आम्ही किनाऱ्यावर आणलं आणि त्यांची चौकशी केली. तिघांनी दावा केलाय की, ते कन्याकुमारीचे असून कुवेतच्या एका कंपनीत काम करतात. दोन वर्षांपासून ते कुवेतमध्ये काम करत आहेत. पण, त्यांना पगार दिला जात नव्हता. तसेच उपाशी ठेवले जात होते. त्यामुळे त्यांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला.

Kuwaiti Vessel in Mumbai
Mumbai News : उध्दव ठाकरे यांच्यानंतर आता आदित्य ठाकरे यांचा कल्याण दौरा

तिघांनी दावा केलाय की, मालकाने त्यांचे पासपोर्ट ठेवून घेतले होते. त्यांनी जीपीएसची मदत घेत प्रवासाला सुरुवात केली. तब्बल १० दिवसानंतर ते मुंबईच्या किनाऱ्यापर्यंत पोहोचले आहेत. पोलिसांनी सांगितलं की, नौका आणि तिघांना तपासण्यात आले असून त्यांना कुलाबा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तिघांना हिंदी, मराठी किंवा इंग्रजी येत नसल्याने चौकशीसाठी काहीसा अडथळा येत आहे. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.