उल्हासनगर - विधानसभा निवडणूक शांततेत आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या नेतृत्वाखाली आणि सहआयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली 9 नोव्हेंबरच्या रात्री 11 वाजल्यापासून ते 10 नोव्हेंबरच्या पहाटे 2 वाजेपर्यंत ठाणे जिल्ह्यातील 5 पोलीस परिमंडळात पोलिसांनी 'ऑल आऊट ऑपरेशन' राबवले आहे.