Mumbai Accident News: झाड कोसळून 33 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; यंदाच्या पावसाळ्यातील पहिला बळी

मालाड पश्चिमेकडील मामलेदार वाडी येथील घटना
Accident News
Accident NewsEsakal
Updated on

राज्यात पावसाचा जोर वाढताना दिसत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुणे मुंबईसह राज्यातील अनेक भागांमध्ये काल मुसळधार पावसाने हजेरी लावली. आजही मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर पावसामुळे काही दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे. (Latest Marathi News)

पावसाळ्यात झाड कोसळून मृत्यू होण्याचा प्रकार समोर आला असून आज पहाटेच्या सुमारास मालाड पश्चिम येथील मामलेदार वाडी परिसरात झाड कोसळून एक व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कौशल महेंद्र जोशी वय वर्ष 33 असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.(Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, मालाड पश्चिमेकडील मामलेदार वाडी परिसरात मणिभाई मुंजी चाळ येथे सुमारे 35 फूट उंच आणि चार फूट रुंदीचे एक पिंपळाचे झाड कोसळले. बुधवारी पहाटे कौशल दोषी, चाळीतील शौचालयात गेला असता हे झाड कोसळले. झाडाचा वजनदार भाग डोक्यावर पडल्यामुळे कौशल यांचा जागीच मृत्यू झाला.(Latest Marathi News)

Accident News
Gondia : गोंदीयात मृत्यूचं तांडव! विहिरीत उतरलेल्या चौघांचा करंट लागून मृत्यू; परिसरात हळहळ

राज्यात पावसाची हजेरी, कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट

पुण्यात आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबईमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नाशिक, पालघर, पुणे, सातारा, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये आज अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, मुंबई, ठाणे, कोल्हापूरसह विदर्भातील जिल्ह्यांमध्येही आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर या जिल्ह्यांनाही यलो अलर्ट देण्यात आला आहे.(Latest Marathi News)

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोकणसह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर राज्यातील इतर भागातही चांगल्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.(Latest Marathi News)

Accident News
Mumbai News: बकऱ्याची बिल्डिंग मध्ये एंट्री मग सुरू झाला राडा! ठाण्यात थेट दंगल नियंत्रण पथकाला बोलवलं अन्

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.