Instagram वर बॉडीबिल्डिंग विषयी माहिती देतो असं सांगून महिलेच्या घरात घुसून तब्बल 'इतक्या' लाखांची चोरी

याप्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात (Vishnunagar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Dombivli Crime
Dombivli Crime esakal
Updated on
Summary

भुरट्या चोराने घरात माहिती देण्याच्या इराद्याने येऊन चोरी केली म्हणून तक्रार केली आहे. अशाप्रकारची समाजमाध्यमांत ओळख झालेल्या इसमांपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

डोंबिवली : इन्स्टाग्रामवर (Instagram) झालेल्या ओळखीतून बॉडीबिल्डिंग (Bodybuilding) विषयी माहिती देतो, असे सांगत महिलेच्या घरात घुसून एका भामट्याने हात साफ केल्याची घटना डोंबिवलीत घडली आहे. याप्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात (Vishnunagar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका महिलेच्या घरातील 4 लाख 47 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.

सोमवारी रात्री साडेअकरा ते मंगळवारी सकाळी साडेआठ वेळेत हा चोरीचा प्रकार घडला आहे. डोंबिवली (Dombivli) पश्चिमेत जयहिंद काॅलनी परिसरात या महिला राहतात. दाखल तक्रारीनुसार महिलेची इन्स्टाग्रामवर प्रणव या इसमाशी ओळख झाली होती. इन्स्टाग्रामवरील ओळखीतून प्रणव याने तक्रारदार महिलेशी संपर्क केला. आपण बॉडीबिल्डिंग संबंधी चांगली माहिती देतो. ती माहिती देण्यासाठी आपण वेळ आणि भेट दिली तर आपण तुम्हास भेटतो.

Dombivli Crime
Congress MLA : आमदार पी. एन. पाटील यांची प्रकृती गंभीरच; बाथरूममध्ये पाय घसरून पडल्याने मेंदूला गंभीर दुखापत

चांगली माहिती मिळत असल्याने महिलेने प्रणवला घरी माहिती देण्यासाठी येण्याची अनुमती दिली. सोमवारी रात्री घरात प्रणवकडून माहिती घेत असताना बोलता बोलता महिलेला झोप लागली. त्या झोपल्या आहेत, हे पाहून प्रणवने या संधीचा गैरफायदा घेत यांच्या घरातील किमती ऐवज, रोख रक्कम असा एकूण 4 लाख 47 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.

Dombivli Crime
Kagal Tehsil : कागल तहसीलमधील अव्वल कारकून 'लाचलुचपत'च्या जाळ्यात; कारवाईमुळे तहसील कार्यालयात उडाली खळबळ

दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर महिलेला प्रणव निघून गेला असल्याचे आणि त्याने घरातील किमती ऐवज चोरून नेला असल्याचे निदर्शनास आले. भुरट्या चोराने घरात माहिती देण्याच्या इराद्याने येऊन चोरी केली म्हणून तक्रार केली आहे. अशाप्रकारची समाजमाध्यमांत ओळख झालेल्या इसमांपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.