ठाणे, नवी मुंबई पाठोपाठ आता शिवसेनेला KDMC मध्ये मोठा धक्का

पहिले आमदार आणि आता माजी नगरसेवकांनीदेखील शिवसेनेला रामराम केला आहे.
Shivsena News | Kalyan Dombivli Municipal Corporation News
Shivsena News | Kalyan Dombivli Municipal Corporation NewsSakal
Updated on

मुंबई : सत्ता गेल्यापासून शिवसेनेला (Shivsena) एका पाठोपाठ धक्के बसत आहे. पहिले आमदार आणि आता माजी नगरसेवकांनीदेखील शिवसेनेला रामराम केला आहे. काल ठाण्यातील 67 पैकी 66 माजी नगरसेवकांवी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची (Eknath Shinde) भेट घेत पाठिंबा असल्याचे आणि शिंदे गटात सहभागी झाल्याचे सांगितले होते. त्यापाठोपाठ संध्याकाळी नवी मुंबई पालिकेतील 38 पैकी 28 माजी नगरसेवकांनी शिंदेंना पाठिंबा देण्याचे जाहीर केले. हे दोन्ही धक्के सहज होत नाही तोच आता कल्याण डोबिंवलीमधील 50 माजी नगरसेवकदेखील शिंदे गटात सहभागी होणार असल्याचे जाहीर केले आहे. (Shivsena Latest News In Marathi)

Shivsena News | Kalyan Dombivli Municipal Corporation News
शिवसेनेने धनुष्यबाणाची आशा सोडली? उद्धव ठाकरेंच्या विधानामुळे चर्चा

मुंबई, ठाणे महापालिकेच्या नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समर्थन दिले असून कल्याण डोंबिवलीतील सुमारे 55 नगरसेवकांनी देखील शिंदे यांना समर्थन दिले आहे. गुरुवारी रात्री नगरसेवक, सेनेतील पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत त्यांच्या भूमिकेला पाठिंबा दील्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. यामुळे कल्याण डोंबिवलीत देखील सेनेला मोठे खिंडार पडले आहे. काही नगरसेवक हे बाहेरगावी आहेत तर काही प्रकृती अस्वास्थ्यामुळे यावेळी उपस्थित राहू शकले नसले तरी अशा सर्व नगरसेवकांनीही आम्ही सर्वजण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत असल्याचेच सांगितल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. (Kalyan Dombivli Municipal Corporation News)

Shivsena News | Kalyan Dombivli Municipal Corporation News
"ही आमची अंतर्गत समस्या", मोहम्मद झुबेरच्या अटकेवर भारताचे जर्मनीला प्रत्युत्तर

मुंबईतील नंदनवन या शासकीय निवासस्थानी या सर्व नगरसेवक पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही भेट घेतली. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सेना भाजपा युतीची सत्ता राहिली आहे. कल्याण हा सेनेचा तर डोंबिवली हा भाजपबालेकिल्ला आहे. मागील पालिका निवडणूकीत सेना भाजपा ने स्वतंत्र निवडणूक लढवली. यावेळी सेनेचे 52 तर भाजपाचे 42 नगरसेवक निवडून आले होते. सेनेने भाजपला कडवी झुंज दिली होती. आगामी निवडणूका लक्षात घेता शिवसेनेने आपली ताकद वाढविण्यास सुरवात केली होती. यातूनच भाजपाचे 7 नगरसेवक काही महिन्यांपूर्वीच सेनेत प्रवेश केला आहे. तर सेनेच्या 3 नगरसेवकांचे निधन झाले आहे.

Shivsena News | Kalyan Dombivli Municipal Corporation News
ईडीच्या धाकापोटीच अनेकजण सेनेतून भाजपात गेले, भुजबळांचा टोला

महापालिकेच्या आगामी निवडणुका आल्या असून सेनेत दुफळी निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व भाजपा यांचे सरकार राज्यात आले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे असा संभ्रम असलेल्या सेनेच्या सैनिकांनी शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे दिसते. या बंडानंतर आता शिवसेना आणि त्यांच्या नेत्यांसमोर ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण डोंबिंवली येथे पक्षाचे अस्तित्त्व टिकवण्याचे मोठे आव्हान असणार आहे. ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे यांची ओळख वनमॅन आर्मी अशीच होती. मात्र, आता एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाण्यात शिवसेनेचा नवा चेहरा कोण हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.