राज्यात 41 टक्के मुलांना लसीकरण

मुंबईत फक्त 21 टक्के मुलांचे लसीकरण
Vaccination
Vaccination SAKAL
Updated on

मुंबई : राज्यात 15 ते 18 वयोगटातील 41 टक्के मुलांचे लसीकरण(children vaccination) झाले आहे. शनिवारपर्यंत राज्यातील 25 लाख मुलांना लसीकरण केले गेले. मात्र, यात मुंबई (Mumbai)पिछाडीवर असून शहरातील 15 ते 18 वयोगटातील कोविड-19 लसीकरणाला (Covid19 vaccination)मिळालेला प्रतिसाद कमी आहे, आतापर्यंत 9 लाख पात्र मुलांपैकी केवळ 21% मुलांनीच लस  घेतली आहे. त्यामुळेच, आता या मुलांना सर्व लसीकरण केंद्रावर लस देण्यास पालिकेचे धोरण आहे.

Vaccination
भारत-रशियाच्या युद्धनौकांची कवायत

मुंबईव्यतिरिक्त , 3 जानेवारीपासून मोहीम सुरू झाल्यापासून राज्यातही, लसीकरण मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे: महाराष्ट्रातील या वयोगटातील 60.6 लाख मुलांपैकी 41% मुलांनी शनिवारपर्यंत लस घेतली आहे. एकूण लसीकरणात पुण्यात सर्वाधिक 2 लाख 34 हजार मुलांना लसकवच देण्यात आले. मुंबईपेक्षा ठाणे, नागूपर मध्ये लसीकरणाची चांगली कामगिरी झाली आहे. पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले की, पालिका पुढील आठवड्यात सर्व लसीकरण केंद्रांमध्ये लहान मुलांच्या वयोगटाचे लसीकरण कण्यास सुरुवात करणार आहे. "आम्ही वॉर्ड स्तरावरील लहान केंद्रांवर देखील लस देऊ, जेणेकरून मुले लस घेण्यासाठी त्यांच्या घराच्या जवळच्या केंद्रात जाऊ शकतील, मुलांना दुसरा डोस 28 दिवसांच्या अंतराने घ्यावा लागेल.(Mumbai Vaccination update)

Vaccination
बसचे स्टेअरिंग हाती घेणाऱ्या योगिनी सातव यांचा सन्मान

पुढील काही दिवसांत लसीकरण आणखी वेग धरेल असा ही विश्वास डॉ. गोमारे यांनी व्यक्त केला आहे. वेळ निश्चित झाल्यावर कोवॅक्सिन आणि कोव्हिशिल्डचे वेळापत्रक आम्हाला ठरवायचे आहे. पहिल्या काही तासांत मोठ्यांना कोव्हिशिल्ड आणि पुढच्या काही तासांत मुलांना कोव्हॅक्सीन, किंवा या उलटही वेळ असू शकेल असेही डॉ. गोमारे यांनी सांगितले. पालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले की, राज्य टास्क फोर्सच्या सदस्यांच्या सल्ल्यानुसारच मुलांना सुरक्षित वातावरणात लस दिली जात आहे. मर्यादित लसीकरण केंद्रावर लस दिली गेली तर वेग कमी राहिल. पालिकेने लहान मुलांच्या लसीकरणासाठी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विशेष मोहीम राबवली आहे, प्रोजेक्ट मुंबई सारख्या एनजीओची मदत घेतली आहे. ही मोहीम पहिल्यांदाच शनिवारी गोरेगाव (प.) येथील एका शाळेत घेण्यात आली.(Mumbai Vaccination center)

राज्याने शनिवारपर्यंत 15 ते 18 वयोगटात 25 लाख लसीकरणाचा टप्पा पार केला. मुलांना लस घेण्याची इच्छा आहे पण, शाळा आणि महाविद्यालये बंद झाल्यापासून वेग कमी झाला आहे. दिवसाला सरासरी 1.5 लाख मुलांचे लसीकरण होते.

- डाॅ. सचिन देसाई, राज्य लसीकरण अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.