MHADA : म्हाडा कोकण मंडळाच्या सोडतीसाठी ४८ हजार ९३८ अर्जदार पात्र

ठाणे शहर व जिल्हा, पालघर, रायगड, रत्नागिरी याभागात उपलब्ध
48 thousand 938 applicants eligible for MHADA Konkan Mandal draw
48 thousand 938 applicants eligible for MHADA Konkan Mandal drawsakal
Updated on

मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा)च्या कोकण मंडळाच्या सोडतीसाठी शेवटच्या दिवसापर्यंत ५९,०५८ अर्ज प्राप्त झाले. तर, ४८,९३८ अर्जदारांनी अनामत रक्कम जमा केली आहे. गुरुवारी, ता.२७ रोजी पात्र अर्जदारांची आकडेवारी जाहीर करण्यात आली. ही यादी अंतिम असून याच अर्जदारांमधून १० मे रोजी सोडत जाहीर केली जाईल, अशी माहीती म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

८ मार्च, रोजी गृहनिर्माण प्राधिकरणाने १४ भूखंडांसह, ४,६४० घरांसाठी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली. मुंबई महानगर प्रदेशाच्या विविध भागात तसेच महाराष्ट्राच्या दक्षिण कोकण भागात पसरलेले आहेत. ठाणे शहर व जिल्हा, पालघर, रायगड, रत्नागिरी याभागात उपलब्ध आहेत. गुरुवार, ता. २७ संध्याकाळी साडेपाच पर्यंत ५९०५८ अर्ज नोंदणी झाली. तर ४८,९३८ अर्जदारांनी अनामत रकमेसह अर्ज सादर केले. १० मे रोजी ठाण्यातील काशिनाथ घाणेकर सभागृहात सोडत काढण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.