Kasara Ghat : नाशिक-मुंबई महामार्गावरील कसारा घाटात 5 कार गाड्यांचा विचित्र अपघात; 9 जण जखमी

मुंबई-नाशिक महामार्गावर मुंबईकडे जाणाऱ्या कंटेनरने समोर चालणाऱ्या 5 कार गाड्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली.
Kasara Ghat Accident
Kasara Ghat Accidentesakal
Updated on
Summary

कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने नवीन कसारा घाटातील तीव्र उतार वळणावर असलेल्या धबधबा पॉईंटच्या अलीकडे हा अपघात घडला.

खर्डी : आज दुपारी अडीचच्या सुमारास नाशिक-मुंबई मार्गावरील (Nashik-Mumbai Highway) नवीन कसारा घाटात (Kasara Ghat Accident) भल्या मोठ्या कंटेनर वाहनासह 5 कार गाड्यांचा विचित्र अपघात झाला. या अपघातातील 9 जखमींना कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.

मुंबई-नाशिक महामार्गावर मुंबईकडे जाणाऱ्या कंटेनरने समोर चालणाऱ्या 5 कार गाड्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. या विचित्र अपघातात मारुती सियाझ, ह्युंदाई, किया, मारुती बलेनो आणि मारुती स्विफ्ट या गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. लोखंडी खांब घेऊन मुंबईच्या दिशेने निघालेल्या कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने नवीन कसारा घाटातील तीव्र उतार वळणावर असलेल्या धबधबा पॉईंटच्या अलीकडे हा अपघात घडला.

Kasara Ghat Accident
Maratha Reservation : 'जरांगे नावाच्या भुताला मुख्यमंत्र्यांनी बाटलीत बंद करावं आणि समुद्रात फेकून द्यावं'; हाकेंची सडकून टीका

खुशबू पेठा, जितेन पिटाडिया, फाल्गुनी पिटाडिया, विनीत मेहता, दिव्या मेहता, प्रमीत सी, हिनल, उज्वला कोडापे, विवेक कोडापे या 9 जखमी रुग्णांवर कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. त्यापैकी 2 गंभीर रुग्ण खासगी रुग्णालयात दाखल झाले. रविवारचा दिवस असल्याने मुंबई नाशिक महामार्गाच्या दोन्ही वाहिन्यांवर वाहतूक मोठ्या प्रमाणावर होती.

Kasara Ghat Accident
''आरक्षणावरील बैठकीपूर्वी विरोधी पक्षाच्या नेत्यांना बारामतीमधून फोन'', भुजबळांचा शरद पवारांवर गंभीर आरोप; म्हणाले...

शहापूर तालुक्यात ठिकठिकाणी गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने नदी, नाले दुधडी भरून वाहू लागल्याने अनेक ठिकाणी छोट्या-छोट्या पुलावरून पाणी जात असल्याने जरंडी, भोसपाडा, अजनुप, वाशाळा, अघई दापूर येथील वाहतूक बंद आहे. तर, 12 जुलैपासून आसनगाव रेल्वे पुलाचे संथ गतीने सुरू असलेले काम व मुंबई-नाशिक महामार्गावर पडलेल्या मोठ-मोठ्या खड्ड्यामुळे व वाहन चालकांच्या एकेरी वाहतुकीमुळे गेल्या 14 तासांपासून आसनगाव पुलापासून दोन्ही बाजूला 10 किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागत आहेत.

यामुळे वाहतूक पोलिसही हतबल झालेत. सध्या संथ गतीने वाहतूक सुरू करण्यात वाहतूक पोलिसांना यश आले आहे. वाहतुकीत तासंतास अडकलेल्या महिला प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, उंबरमाळी स्थानकाचे छप्पर पूर्णपणे गळत असल्याने मुसळधार पावसामुळे येथे धबधब्याचे स्वरूप आले असून प्रवाशांना पावसाच्या पाण्यात भिजत उभे रहावे लागत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.