Dombivali Fraud : परदेशी चलनाचे आमिष दाखवून 5 लाखाची लुबाडणूक

परदेशी चलनाचे आमिष दाखवत एकाची 5 लाखाडा लुबाडणूक करण्यात आल्याची घटना विष्णुनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.
Fraud news
Fraud news esakal
Updated on

डोंबिवली - परदेशी चलनाचे आमिष दाखवत एकाची 5 लाखाडा लुबाडणूक करण्यात आल्याची घटना विष्णुनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. कल्याण येथील शैलेंद्र चौव्हाणला चौघांनी दिनार या परदेशी चलनाच्या 1 हजार 350 नोटा देण्याचा बहाणा करुन हातात जुन्या पेपरच्या कागदांचा रोल देत ही फसवणूक केली आहे. याप्रकरणी विष्णूनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस शोध घेत आहेत.

कल्याण पूर्वेतील काटेमानिवली परिसरात शैलेंद्र चौव्हाण (वय 47) हे राहण्यास असून ते खासगी नोकरी करतात. शैलेंद्र यांच्या तक्रारीवरुन विष्णूनगर पोलिस ठाण्यात सानिया, इम्रान, सानियाची बहिण व एक 20 वर्षीय मुलगा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला हे. या चौघांनी शैलेंद्र यांचा श्वास संपादन केला.

सोमवारी सकाळी 11.30 च्या दरम्यान त्यांनी शैलेंद्र यांना डोंबिवली पश्चिमेला कोपर रेल्वे स्टेशनच्या बाहेर बोलावले. त्यांना दिनार या विदेशी चलनाच्या 1 हजार 350 नोटा देण्याचा बहाणा करुन त्यांना पांढऱ्या रंगाची पिशवी हातात दिली. या विदेशी चलनाच्या बदल्यात त्या चौघांनी शैलेंद्र यांच्याकडून 5 लाखाची रोख रक्कम घेतली. शैलेंद्र यांनी ते चौघे निघून गेल्यानंतर पिशवी उघडून पाहिली. पिशवी उघडून पाहताच त्यांना धक्काच बसला.

पिशवीमध्ये जुन्या पेपरचे कागदाचे रोल होते. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शैलेंद्र यांनी विष्णूनगर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. दाखल तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे. पोलिस उपनिरीक्षक ए.के.आंधळे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.