डोंबिवली - बारवी पाणी पुरवठा योजनेवरील पाण्याची मागणी वाढत आहे. या वाढत्या मागणीमुळे डोंबिवली औद्योगिक क्षेत्र तसेच रहिवाशांना कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. ही समस्या मार्गी लावण्यासाठी शहाड पाणी पुरवठा योजना पुनर्जीवित करण्यात येत आहे.
एमआयडीसीच्या माध्यमातून 585 कोटी रुपयांचा निधीला यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. याअंतर्गत जलवाहिनी टाकण्याबरोबरच विविध कामे केली जाणार आहेत. यामुळे कल्याण, डोंबिवली आणि आसपासच्या विभागातील नागरिकांची पाण्याची समस्या मार्गी लागणार आहे.