मुंबई - वर्षानुवर्षे घराच्या प्रतिक्षेत असलेल्या गिरणी कामगारांना खुशखबर आहे. म्हाडाने पनवेल नजीक कोन येथील २४१७ घरांसाठी २०१६ मध्ये लॉटरी काढली होती. त्यामध्ये यशस्वी ठरलेल्या पात्र व पैसे भरलेल्या ५८५ गिरणी कामगारांना गुरूवार १५ फेब्रवारी रोजी दुपारी एक वाजता चावी वाटप केले जाणार आहे. वांद्रे पूर्वेकडील समाज मंदीर हॉलमध्ये चावी वाटपाचा कार्यक्रम होणार आहे.
गिरणी कामगारांना हक्काचे घर देण्यासाठी म्हाडा प्रयत्नशील असून मुंबई मंडळाने कोन येथील घरासाठी लॉटरी काढली होती. त्याच्या चावी वाटपासाठी गिरणी कामगार घर संनियंत्रण समितीचे अध्यक्ष, आमदार सुनिल राणे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम होणार आहे. एमएमआरडीएतर्फे बांधलेल्या प्रत्येकी १६० चौरस फुटाच्या दोन सदनिका एकत्र करून ३२० चौरस फुट चटई क्षेत्रफळ आकारमानाची सदनिका गिरणी कामगारांना मिळणार आहे.
कोरोना काळात या सदनिका संबंधित महापालिकेने ताब्यात घेऊन प्रशासकीय कारणास्तव त्याचा वापर केल्यामुळे या सदनिकांची दुरवस्था झाली होती. त्यामुळे या सदनिकांच्या दुरूस्तीसाठी म्हाडाने पुढाकार घेऊन सुरू केलेले काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे त्याचा ताबा आता गिरणी कामगारांना दिला जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.