मुंबईः गेल्या चार ते पाच महिन्यापासून महाराष्ट्र राज्य कोरोना व्हायसरचा सामना करत आहेत. कोरोनाच्या सुरुवातीपासून मुंबई शहरात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा सर्वाधिक होता. शहराला कोरोनाचा जास्त फटका बसला. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मुंबई पालिकेनं विविध पातळीवर उपाययोजना आखल्या. याच पार्श्वभूमीवर कोरोनाच्या काळात मुंबई महापालिकेच्या तिजोरीतील तब्बल ५९८ कोटी रुपये खर्च झालेत. कोरोनाबाधित आणि संशयित रुग्णांसाठी सेवा-सुविधा उभ्या करण्याबरोबरच बेघर, बेरोजगार उपाशीपोटी राहू नयेत यासाठी वितरित करण्यात आलेले अन्नपदार्थ आदींसाठी हे पैसे खर्च झाल्याचं समजतंय.
या संकटकाळात पालिकेकडून कोरोनाबाधित रुग्णांसाठी रुग्णालयांमधील सुविधांमध्ये वाढ केली. तसंच औषधांचा साठा, आवश्यक ती उपकरणेही उपलब्ध करण्यात आली. त्याचबरोबर संशयित रुग्णांसाठी मुंबईत ३३८ ठिकाणी कोरोना केअर सेंटर सुरू करण्यात आली. १७४ ठिकाणी कोरोना केअर सेंटर २ ची सुविधा पालिकेनं सुरु केली होती. त्यापैकी ६० केंद्रे कार्यान्वित करण्यात आली. महालक्ष्मी रेसकोर्स, वरळीचे एनएससीआय मैदान, गोरेगावचे नेस्को, सोमय्या मैदान आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रुग्णांसाठी केंद्रे उभारण्यात आली. काही ठिकाणी प्राणवायूची, तर काही ठिकाणी अतिदक्षता विभागासारखी व्यवस्थाही करण्यात आली.
मुंबई पालिकेनं बेघर आणि बेरोजगार कामगारांना अन्नपदार्थ पाकिटांचा पुरवठा करण्यास सुरुवात केली. सुमारे साडेतीन लाख व्यक्तींना दुपारी आणि रात्री जेवणाचा पुरवठा पालिकेकडून करण्यात येत होता. नगरसेवकांच्या मतदारसंघातही अन्नपदार्थ पाकिटे वाटली जात होती. आता बहुसंख्य परप्रांतीय मुंबईतून निघून गेल्यानं नोंद असलेले बेघर, बेरोजगारांनाच अन्न पाकिटांचे वाटप होत आहे.
एकूण- ५९८.८३ कोटी रुपये
598 crore expenditure Mumbai Municipal Corporation during Coronavirus period
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.